शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भंगसाळ नदीवरील जुना पूल इतिहासजमा होणार, चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 4:58 PM

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुडाळला जोडणारा भंगसाळ नदीवरील जुना पूल चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. गेली अनेक दशके अविरत सेवा देणारा, मात्र पावसाळ््यात पुराच्या पाण्यामुळे महामार्ग ठप्प करणारा हा पूल आपल्या जुन्या आठवणी मागे ठेवून आता इतिहासजमा होणार आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देभंगसाळ नदीवरील जुना पूल इतिहासजमा होणार, चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरुनव्या पूलावरुन वाहतूक सुरु करणार

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुडाळला जोडणारा भंगसाळ नदीवरील जुना पूल चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. गेली अनेक दशके अविरत सेवा देणारा, मात्र पावसाळ््यात पुराच्या पाण्यामुळे महामार्ग ठप्प करणारा हा पूल आपल्या जुन्या आठवणी मागे ठेवून आता इतिहासजमा होणार आहे.जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असून, महामार्गालगतच्या अनेक जुन्या वास्तू या कामात इतिहासजमा झाल्या आहेत. महामार्गावरील अनेक ब्रिटिशकालीन पूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहेत. कुडाळ शहरातून जाणाऱ्या भंगसाळ नदीवरील पूल काही वर्षांपूर्वी बांधला होता.

आता या पुलाच्या बाजूला भव्य असा नवीन पूल तयार झाला असून, जुन्या पुलाच्या जागेवर दुसरा एक पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुलाच्या बाजूने पर्यायी मार्ग तयार करण्यात आला असून, या मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.सोमवारपासून भंगसाळ नदीवरील जुन्या पुलाचे बांधकाम तोडण्याचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीने सुरू केले आहे. महामार्ग झाल्यापासून या पुलाने जिल्हावासीयांना अविरत सेवा दिली असून, कोणतीही अनुचित घटना या पुलाकडे घडली नाही, हे या वैशिष्ट्य आहे. नव्या गोष्टींसाठी जुन्याचा त्याग करावा लागतोच. त्यामुळे आपल्या जुन्या आठवणी मागे ठेवून भंगसाळ नदीवरील हा पूलही आता इतिहासजमा होणार आहे.भंगसाळवर पाणी म्हणजे मोठा पाऊस!पावसाळ््यात भंगसाळ नदीला पूर आल्यानंतर काही वेळा पुराचे पाणी या पुलावरूनही वाहत असते. एका पावसाळ्यात किमान दोन ते तीन वेळा तरी असा प्रकार घडून महामार्गावरील वाहतूक ठप्प होत असे. त्यामुळे भंगसाळ पुलावरून पाणी म्हणजे मोठा पाऊस, असे मोजमापच जिल्ह्यात तयार झाले होते. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग