शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वित्त समिती सभेला अधिकाऱ्यांची दांडी, सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:48 IST

वित्त समिती सभेला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी दांडी मारत असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. महिन्यातून एक सभा घेता आणि त्यालाही अधिकारी दांडी मारत असतील तर सभा घेतातच का असा प्रश्न नागेंद्र परब यांनी उपस्थित केला

ठळक मुद्दे वित्त समिती सभेला अधिकाऱ्यांची दांडी, सदस्यांनी व्यक्त केली नाराजी महिन्यातून एकदाच होते सभा, मग सभा घेतातच कशाला; नागेंद्र परब यांचा सवाल

सिंधुदुर्गनगरी : वित्त समिती सभेला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी दांडी मारत असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. अधिकारी उपस्थित नसल्याने सदस्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तसेच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. तसेच महिन्यातून एक सभा घेता आणि त्यालाही अधिकारी दांडी मारत असतील तर सभा घेतातच का असा प्रश्न नागेंद्र परब यांनी उपस्थित केला.जिल्हा परिषदेची वित्त समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी समिती सचिव तथा जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, समिती सदस्य संतोष साटविलकर, महेंद्र चव्हाण, नागेंद्र परब, रवींद्र जठार आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.आजच्या वित्त समितीला उपस्थित सदस्यांनी विविध मुद्दे आणि प्रश्न उपस्थित करत त्याबाबतची माहिती सभागृहात मागितली. मात्र सभेला काही विभागांचे अधिकारी सोडाच पण कर्मचारीही उपस्थित नसल्याने सदस्यांना त्यांच्या प्रश्नांची माहिती मिळू शकली नाही. काही वेळा तर सभेतून अनुपस्थित अधिकाऱ्यांना सभेत उपस्थित राहण्याचा निरोपही देण्यात आला.काही काळ त्यांची वाट पाहूनही ते येत नसल्याने महिन्यातून एक सभा होते. त्यालाही अधिकारी दांडी मारत असतील तर सभा घेतातच कशाला असा प्रश्न सदस्य नागेंद्र परब यांनी उपस्थित केला. सदस्य परब यांच्या प्रश्नाला समर्थन देत उर्वरित सदस्यांनीही सभागृहात नाराजी व्यक्त केली. मात्र, या सर्व प्रकारात वित्त अधिकारी अनुपस्थित राहत असलेल्या अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.मालवण तालुक्यातील आरोग्य विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने दुर्धर आजारग्रस्तांना मदतीचे धनादेश परस्पर त्रयस्थ व्यक्तीकडे दिल्याच्या मद्द्यावर चर्चा झाली असता संबंधित कर्मचाऱ्यांने आपली चूक मान्य करत माफी मागितली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले.कृषी विभागातील झारीतील शुक्राचार्य शोधा : बाळा जठारजिल्हा परिषद कृषी विभागातील साहित्याची एका बडतर्फ कर्मचाऱ्यांने तोडफोड केली. हा प्रकार अनुचित आहे. मात्र त्याला असे करण्यास कोणी भाग पाडले का? याबाबत चौकशी करा. तसेच लोकप्रतिनिधीने असा प्रकार केला असता तर प्रशासनाने त्याचा बाऊ केला असता. मात्र कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील वाद असल्याने त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असे सांगत या विभागातील झारीतील शुक्राचार्याचा शोध घ्या अशी सूचना सदस्य बाळा जठार यांनी सभेत केली....अन्यथा प्रशासनच जबाबदार राहीलराष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे कणकवली तालुका व्यवस्थापक हे तालुक्यातील समूह संघटक महिलांशी गैरवर्तन करत आहे. त्याबाबत अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला चार वेळा समज देण्यात आली आहे. मात्र त्याच्या वागणुकीत फरक झालेला नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे त्या उपद्रवी अधिकाऱ्याला लोकांकडून प्रसाद मिळाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी सभेत दिला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग