शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस जनावरे वाहून नेणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:43 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळपे येथून जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक शुक्रवारी दुपारी मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

ठळक मुद्देमांगवली तिठा कोळपेतून राजरोस वाहतूकजनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडून पोलिसांच्या ताब्यात पोलिसांची भूमिका संभ्रमात टाकणारी

वैभववाडी,दि. २३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळपे येथून जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक शुक्रवारी दुपारी मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्या ट्रकमध्ये दहा बैल कोंबलेले होते. ट्रकवरील कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे. ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणात राजकीय व्यक्तिंचा दबाव वाढल्यामुळे जनावरे तस्करीला व्यापाराचे गोंडस रुप देऊन पोलिसांनी गुन्ह्यातील हवा काढून टाकली. पोलिसांच्या या चलाखीकडे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम कोणत्या चष्म्यातून पाहतात यावर जनावरे वाहतुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

कोळपे, वेंगसर, मांगवलीमार्गे भुईबावडा घाटातून बैल आणि गायींची बेकायदा नियमित वाहतूक केली जाते. याबाबत पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी कल्पना दिली आहे. मात्र, स्वत:हून पोलीस कारवाई करायला तयार नसल्याने ग्रामस्थांनीच पाळत ठेवून शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मांगवली तिठ्यावर जनावरांची वाहतूक करणारा ट्रक (एम. एच. ०९; सीए-८५३३) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.

राधानगरी तालुक्यातील कसबा येथील महेंद्र वसंत लोकरे हा ट्रकचालक असून तोच मालक होता. ट्रकमध्ये १० बैल होते. कोळपे येथून ती जनावरे कोल्हापूरकडे घेऊन जात होते. जनावरांचा ट्रक पकडल्याचे समजताच एका युवा नेत्याने भ्रमणध्वनीद्वारे पोलिसांशी संपर्क साधून कारवाई न करण्यासाठी दबाव टाकल्याची कुजबूज आहे.

याशिवाय तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी थेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे ट्रकचालकाचे नाव सांगण्यास पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखवून सुरुवातीलाच टोलवाटोलवी केली.

जनावरांच्या बेकायदा वाहतुकीला अभय देऊन दलालांना पाठीशी घालणाऱ्या  पोलिसांबाबत अवैध धंदेवाल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम कोणते पाऊल उचलतात याची उत्सुकता आहे.

पोलिसांची भूमिका संभ्रमात टाकणारीगोहत्याबंदीची कारवाई टाळण्यासाठी कत्तलखान्याकडे नेली जाणारी जनावरे कोपार्डेच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न अगदी शिताफीने केला गेला आहे. त्यामुळेच ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

विशेष म्हणजे कोंडवाडा नसल्याचे कारण पुढे करून ट्रकमधील बैल मूळ मालकांच्या ताब्यात दिल्याचे पोलीस सांगतात. मात्र, बेकायदा जनावरे वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक पोलिसांनी सोडून दिल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :konkanकोकणPoliceपोलिस