शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गावाला हक्काचा इंजिनिअर

By admin | Updated: November 9, 2014 23:32 IST

पंचायत सक्षमीकरण अभियान : जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींचा समावेश

रहिम दलाल - रत्नागिरी --स्थानिक विकासाचे केंद्र म्हणून ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ मोठ्या ग्रामपंचायती विकसित करण्यासाठी व त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामाचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास फार उशीर होतो. त्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावरच विकासकामाचे मूल्यांक होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील, या हेतूने शासनाने हे पाऊल उचलले आहे.राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करणार आहेत. त्याचबरोबर त्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून काम पूर्ण होईपर्यंत देखरेख करणे तसेच कामाच्या मुल्यांकनासह पूर्णत्त्वाचा दाखलाही हे अभियंतेच देणार आहेत. सुमारे ५००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियंते नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २१ ग्रामपंचायती आहेत. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात येणाऱ्या अभियंत्यांमुळे विकासकामे लवकर मार्गी लागणार आहेत. त्यामुळे वाडी, वस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.तालुकाग्रामपंचायत दापोलीबुरोंडी, गिम्हवणे, दाभोळ, हर्णै, जालगाव.खेड भरणे.चिपळूणपोफळी बुद्रुक, सावर्डे, गुहागरपाटपन्हाळे, पालशेत. खेर्डी.संगमेश्वरकडवई, नावडी. रत्नागिरीपावस, करबुडे, नाचणे, कुवारबाव, गोळप, मिरजोळे, शिरगाव.राजापूर सागवे.२१ ग्रामपंचायतींमध्ये होणार अभियंत्यांच्या नियुक्त्याथेट ग्रामपंचायतीमधून होणार विकास कामे५००० पेक्षा जास्त लोकसंख्येचा निकषग्रामपंचायती होणार तांत्रिकदृष्ट्या सक्षमगावच्या विकासाला गती मिळणार.