स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या ग्लेनचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त, व्हिसेरा राखून ठेवला
By अनंत खं.जाधव | Updated: May 9, 2023 19:17 IST2023-05-09T19:05:13+5:302023-05-09T19:17:44+5:30
पोलीस सर्व घटनेची सखोल चौकशी करणार

स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या ग्लेनचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त, व्हिसेरा राखून ठेवला
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद च्या स्विमिंग पूलमध्ये बुडून ग्लेन जाॅन डिसोजा यांचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप पोलीसाचा तपास धिम्यागतीने सुरू आहे.ग्लेन याच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलीसांना प्राप्त झाला असून प्रथम दर्शनी बुडून मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पोलीस हा व्हिसेरा उच्चस्तरीय तपासणी साठी पुणे येथे पाठवणार आहेत.अशी माहीती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली तसेच या प्रकरणी जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याचे ही अधिकारी म्हणाले.
सावंतवाडी नगरपरिषद च्या स्विमिंग पूलात रविवारी एक ग्लेन डिसोजा हा युवक बुडून मृत पावला या घटनेला दोन दिवस उलटले तरी अद्याप पर्यंत पोलीसांकडून चौकशीस सुरू आहे.या मध्ये ग्लेन च्या वडिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर ही पोलीसांनी वेगाने पाऊले उचलण्यात आली नाहीत.या प्रकरणात अद्याप पर्यत कोणाचेही जाबजबाब नोंदवण्यात आले नाही.किंवा कागदपत्र तपासण्यात आली नाहीत ज्याला नगरपरिषद कडून ठेका देण्यात आला होता.त्या ठेकेदाराकडून देण्यात आलेली कागदपत्र योग्य आहे का हे ही पोलीसांनी तपासले नसल्याचे पुढे आले आहे.
ग्लेन याचा मृत्यू बुडून झाला असे शवविच्छेदन अहवालात म्हटले असले तरी पोलीसांकडून व्हिसेरा राखून ठेवत तो पुणे येथील वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे.असे यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले. पोलीस सर्व घटनेची सखोल चौकशी करणार आहेत.आणि पोलीसांकडून अक्समृत्यूचा कधीही तपास करता येतो असे ही स्पष्ट केले आहे.