शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, सेवाशर्ती लागू करण्यासाठी आग्रह धरणार, नितेश राणे यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:23 IST

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनस्तरावर मांडून वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यापुर्वी शासनाकडे ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल ज्या समित्यांनी दिलेला आहे. त्याचाही विचार शासनाला करायला भाग पाडू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देमागण्यांचा अहवाल ज्या समित्यांनी दिला आहे, त्याचाही विचार करायला भाग पाडू संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार नीतेश राणे यांची भेट

कणकवली : सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनस्तरावर मांडून वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यापुर्वी शासनाकडे ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल ज्या समित्यांनी दिलेला आहे. त्याचाही विचार शासनाला करायला भाग पाडू असेही त्यांनी यावेळी सांगितले.येथील ओमगणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय शिंदे, कार्यवाह महेंद्र पटेल, अनिल शिवडावकर, पुनम नाईक, जान्हवी जोशी, राजन ठाकूर, सिद्धी हरयाण, दिक्षा नेरुरकर, रंजना पेठेकर, सुकन्या देसाई आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले.ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली. यावेळी शासनाकडून वेतनश्रेणी व सेवाशर्तीची पुर्तता केली जावी अशी मागणी केली. यासाठी शासनाला यापुर्वी पागे समिती, प्रभाराव व व्यंकप्पा समिती यांनी जो अहवाल दिलेला आहे तो स्वीकारावा व त्यांच्या शिफारशी आपल्याला लागु कराव्यात अशा मागणीचे निवेदन दिले.

मागील काही वर्षात दर पाच वर्षांनी ग्रंथालयांचे अनुदान शासनाने सरसकट दुप्पट केले आहे. परंतु, २००४ नंतर या अनुदानात केवळ ५० टक्के वाढ केलेली आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा प्रश्न येतो. त्यावेळी मात्र निधीचे कारण पुढे केले जाते.

वाढत चाललेल्या महागाईत ५०० ते २००० एवढ्या तुटपुंज्या पगारावर काम करणाºया ग्रथालय कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. त्यांना महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढ दिली जावी.

१०० टक्के अनुदानाची मागणी पुर्ण करावी जेणेकरून त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार नाही. ग्रंथालय कायद्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत . परंतु या चळवळीची स्थिती शासनाच्या नाकर्तेपणामुळे चिंताजनक बनली असल्याची कैफियत कर्मचाऱ्यांनी मांडली.

 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग