शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात दौरे करणाऱ्या नितेश राणेंनी आधी मतदारसंघातील आरोग्य समस्यांकडे लक्ष द्यावे, सुशांत नाईकांचा टोला

By सुधीर राणे | Updated: December 1, 2023 16:01 IST

स्वतःचे खासगी हॉस्पिटल चालावे म्हणून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष

कणकवली: निवडणूक प्रचारासाठी तेलंगणात दौरे करणाऱ्या आमदार नितेश राणेंनी कर्तव्याची जाणीव ठेवून आधी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष द्यावे, असा टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला. कणकवली येथील विजय भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाकर्त्या स्थानिक आमदार नितेश राणेंमुळे कणकवली विधानसभा क्षेत्रात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. यामुळे कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा म्हणून युवासेनेने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आहे. पडवेमधील स्वतःचे खासगी हॉस्पिटल चालावे म्हणून राणे आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही नाईक यांनी केली.युवासेनेच्यावतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर कणकवली विधानसभा क्षेत्रातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत. जनतेच्याप्रति असलेले आपले कर्तव्य लक्षात घेऊन युवा सेना काम करीत आहे. केवळ विरोधक म्हणून ढासळलेल्या आरोग्य यंत्रणेवर आवाज उठवून फक्त युवासेना स्वस्थ बसणार नाही. जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले.शिबिरात आढळलेल्या सर्व मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया ओरोस येथील  शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांचा प्रवास आणि जेवण खर्च युवा सेना करणार आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ६ डिसेंबरला शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, १० डिसेंबरला कलमठ, १६ डिसेंबरला रोजी वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, २१ डिसेंबर रोजी कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ डिसेंबरला रोजी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार असून याचा लाभ जनतेने घ्यावा. आरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांचा बीपी, मधुमेह आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.पत्रकार परिषदेस युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, नितेश भोगले, दत्तप्रसाद धुरी, संतोष ठुकरुल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Healthआरोग्यKankavliकणकवली