शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंनी जनतेची फसवणूक थांबवावी, सुशांत नाईकांची टीका

By सुधीर राणे | Updated: July 11, 2023 15:47 IST

केंद्र आणि राज्यात आमदार नितेश राणेंचा पक्ष सत्तेत असताना देखील ठोस निर्णय होवू शकत नाही

कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री, डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची गरज आहे. मात्र, केंद्र आणि राज्यात आमदार नितेश राणेंचा पक्ष सत्तेत असताना देखील त्याबाबत ठोस निर्णय होवू शकत नाही. खासगी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात १२ कर्मचारी देऊन नितेश राणेंनी जनतेची फसवणूक थांबवावी, अशी टीका  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे.तसेच पुढील काळात युवा सेना सरकारला जाग आणण्यासाठी कणकवली विधानसभा मतदार संघातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण सेवेबाबत आढावा घेण्यासाठी धडक देणार असल्याचा इशाराही दिला. कणकवली येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेनेचे विधानसभा संघटक राजू राठोड, सचिन आचरेकर, भोगले, फोंडाघाट विभागप्रमुख सिद्धेश राणे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.सुशांत नाईक म्हणाले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती, तापाचे, साथ रोगांचे रुग्ण तपासणीसाठी येतात. मात्र, त्या रुग्णांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी तसेच लहान मुलांच्या तपासणीनंतर उपचारासाठी यंत्र सामुग्री आवश्यक असल्याचे डॉ. धर्माधिकारी सांगत आहेत. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी आवश्यक मागणी प्रमाणे पूर्तता केली पाहिजे होती. मात्र, तसे झालेले नाही.आमदार राणे यांनी खासगी संस्थेमार्फत १२ कर्मचारी का दिले आहेत? राज्यात शासन त्यांचे आहे. मग कायमस्वरूपी कर्मचारी का भरले जात नाहीत. डॉ.धर्माधिकारी यांना तुमची शस्त्रक्रिया आम्हाला करायला लावू नका, अशी धमकी दिली. त्यामुळेच या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर येत नाहीत असा आरोप नाईक यांनी यावेळी केला.वायफाय जोडणी जनता  शोधत आहेनितेश राणेंनी सुरु केलेली वायफाय जोडणी, कणकवलीची जनता  शोधत आहे. औषध आपल्या दारी, स्कुबा डायव्हिंग असे प्रकल्प आमदारांनी आणले होते.  ते कुठे आहेत? आता रुग्णालयात आलेले खासगी कर्मचारी किती दिवस राहणार आहेत? असा सवालही सुशांत नाईक यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Kankavliकणकवलीhospitalहॉस्पिटल