वैभववाडी : तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच महेश संसारे यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. गेली दोन-तीन वर्षे पक्षीय राजकारणापासून ते अलिप्त होते. आता ते ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आले आहेत.मांगवली येथे आमदार राणेंच्या उपस्थितीत बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेश संसारे, त्याच्या पत्नी माजी सभापती सुवर्णा संसारे यांच्यासह त्यांच्या अनेक अधिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती अक्षता डाफळे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, बाळा हरयाण, हर्षदा हरयाण, प्राची तावडे आदी उपस्थित होतेयावेळी राणे म्हणाले, ''मांगवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून गावाने इतिहास घडविला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी १० लाखांचा निधी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यापुढे विकासाची चिंता अजिबात करु नका, असेही त्यांनी सांगितले.दोन वर्षे होते राजकारणापासून अलिप्तभाजपात प्रवेश केलेले संसारे हे सध्या तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय मांगवली ग्रामपंचायतीचे ते माजी सरपंच आहेत. आताही त्यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय सुवर्णा संसारे यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भुषविले आहे. गेली दोन वर्ष हे दोघेही राजकारणापासून अलिप्त होते. परंतु, आता त्यांनी पुन्हा सक्रीय राजकारण प्रवेश केला आहे.
मांगवलीचे संसारे भाजपात, बिनविरोध सदस्यांचा नीतेश राणेंच्या हस्ते सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 14:05 IST
Grappanchyat Election Nitesh Rane- वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच महेश संसारे यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. गेली दोन-तीन वर्षे पक्षीय राजकारणापासून ते अलिप्त होते. आता ते ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आले आहेत.
मांगवलीचे संसारे भाजपात, बिनविरोध सदस्यांचा नीतेश राणेंच्या हस्ते सत्कार
ठळक मुद्देमांगवलीचे संसारे भाजपातबिनविरोध सदस्यांचा नीतेश राणेंच्या हस्ते सत्कार