शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Nitesh Rane in Goa: मोदींच्या सभेला नितेश राणे शेवटच्या रांगेत बसले; फडणवीसांनी पाहिले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:27 IST

Nitesh Rane in Goa: दोन दिवस आराम करणार असल्याचे सांगत नितेश राणे यांनी थेट गोवा गाठल्याने चर्चांना उधान आले आहे.

शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर दोन दिवस विश्रांती घेणार असल्याचे जाहीर करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे अचानक गोव्यात दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या ठिकाणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला हजर झाले आहेत. 

नितेश राणे आपल्या सहकाऱ्यांसमवेत मागच्या रांगेत बसले होते. परंतू व्यासपीठावर असलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी तेथूनच त्यांना पाहून तेथील स्थानिक कार्यकर्त्यांना राणेंना पहिल्या रांगेत बसवायला सांगितले. यानंतर नितेश राणेंना अन्य आमदारांसोबत पहिल्या रांगेत बसविण्यात आले. 

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले नितेश राणे यांची आज जामीनावर सुटका झाली. पोलीस कोठडीतून बाहेर येताच नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. नितेश राणेंना राजकीय आजार झाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या शस्त्रक्रियेबाबतच्या मुद्द्यावर विधान करुन खळबळ उडवून दिली. "प्रश्न तर आम्हीही विचारू शकतो. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट घालतात का?", असा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. 

यानंतर आपल्या प्रकृतीविषयीही माहिती दिली. "मला आजही त्रास होतोय, कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार आहे. मणका, पाठीचा त्रास, शुगर लो होत आहे. त्यावर उपचार घेणार आहे. आताच माझं बीपी तपासून पाहिलं तर ते १५२ इतकं आहे,'' असे ते म्हणाले. आता मी आराम करणार आहे, दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही, गोवा निवडणुकीत माझ्यावर जबाबदारी होती मात्र तेथेही मी जावू शकलो नाही. त्यामुळे तब्येत सांभाळून मी कामाला लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मात्र, दोन दिवस आराम करणार असल्याचे सांगत नितेश राणे यांनी थेट गोवा गाठल्याने चर्चांना उधान आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात गोव्यातील म्हापसा येथे सभा होणार आहे. उत्तर गोव्यातील १९ मतदारसंघांसाठी ही सभा असणार आहे. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Narendra Modiनरेंद्र मोदीGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२