निर्सगाची हानी नाही थांबली तर भविष्यात धोक्याची घंटा - सतिश लळीत

By अनंत खं.जाधव | Published: April 8, 2024 07:26 PM2024-04-08T19:26:07+5:302024-04-08T19:26:39+5:30

जयानंद मठकर स्मृती पुरस्काराने लळीत सन्मानित 

Nirsga harm is not stopped, but the alarm bells in the future says Satish Lalit | निर्सगाची हानी नाही थांबली तर भविष्यात धोक्याची घंटा - सतिश लळीत

निर्सगाची हानी नाही थांबली तर भविष्यात धोक्याची घंटा - सतिश लळीत

सावंतवाडी : पर्यावरण टिकले तरच निर्सग टिकेल मात्र केंद्रातील सरकार ने पर्यावरणाचे नियमच धाब्यावर बसवले असल्याने बेसुमार वृक्षतोडी बरोबर निसर्गाची हानी सुरू आहे.त्यामुळे आगामी वर्षांत यांचे आपणास दुष्परिणाम भोगावे लागतील याची चाहूल आतापासूनच लागण्यास सुरूवात झाली आहे.असे भिती निवृत्त माहिती व जनसंपर्क उपसंचालक सतिश लळीत यांनी व्यक्त केली.

श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी येथे आयोजित ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै.जयानंद मठकर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प रविवारी पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन या विषयावर लळीत यांनी गुंफले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रान माणूस प्रसाद गावडे यांनी भूषविले.
यावेळी जयानंद मठकर स्मृती पुरस्काराने लळीत यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यी कमल परूळेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

यावेळी प्रसाद पावसकर, डॉ सई लळीत, रमेश बोंद्रे, अँड संदीप निंबाळकर, प्रवीण बांदेकर, सिमा मठकर, मिहीर मठकर डॉ सुमेधा नाईक धुरी उपस्थित होत्या. यावेळी परूळेकर म्हणाल्या, जयानंद मठकर यांच्या बऱ्याच गुणांचा साधर्म्य असणारे सतिश लळीत यांना स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही निवड योग्य आहे. जयानंद मठकर यांना लोकशाही अभिप्रेत होती.आणि तशी लोकशाही आपल्या देशात आहे काय? याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे परूळेकर म्हणाल्या.

लळीत म्हणाले, मला प्रा मधू दंडवते,जयानंद मठकर यांच्या सान्निध्यात काही दिवस घालवता आले त्यामुळे पुरस्कार स्वीकारताना माझी जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले आपल्याकडे नैसर्गिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण असे दोन भाग आहेत सांस्कृतिक पर्यावरण बदलत असते. मात्र नैसर्गिक पर्यावरणात बदल होत नाही. नैसर्गिक पर्यावरण निर्माण करण्यासाठी भरपूर काळ जावा लागतो. पण नैसर्गिक पर्यावरणावर कुऱ्हाड मारली जाते तेव्हा मोठा पर्यावरणीय ऱ्हास होत आहे. जंगल तोडण्यासाठी दोडामार्ग मध्ये न्यायालयाची बंदी असूनही कुऱ्हाड मारली जात आहे हे दुर्देव आहे. नैसर्गिक जंगल कत्तल झाल्यावर उभ्या राहणाऱ्या कृत्रिम जंगलात नैसर्गिकता नाही. पर्यावरणाबद्दल कोणतीही आस्था नसणारे सरकार दहा वर्षे केंद्रात आहे. अस्तित्वात असलेले कायदे व संस्था नियम वाकवून काम करत आहेत.पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प मंजूर करताना जनतेला कळणार नाही अशी खबरदारी घेतली जात आहे. 

जलयुक्त शिवार योजना मजुरांची होती पण तीकंत्राटदारांची ठरली आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे लळीत म्हणाले.यावेळी प्रसाद गावडे यांनी जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या परिसराची विस्तृत मांडणी केली.

Web Title: Nirsga harm is not stopped, but the alarm bells in the future says Satish Lalit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.