शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

आंजिवडे घाटासंदर्भात विनायक राऊतांनी केली ग्रामस्थांची फसवणूक, नीलेश राणेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 5:52 PM

नीलेश राणे यांनी आपण याबाबत राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर जमेल तेवढा प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

कुडाळ : माजी खासदार नीलेश राणे यांनी काल, सोमवारी माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणी केली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आंजिवडेवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप केला.  तसेच पत्रकारांशी बोलताना खासदार विनायक राऊत हे खोटे बोलत असल्याचा आरोपही यावेळी केला.यावेळी माजी सभापती मोहन सावंत, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, आनंद शिरवलकर, योगेश बेळणेकर, राजा धुरी, रुपेश कानडे, राजन भगत, कृष्णा पंधारे, दत्ता कोरगावकर, आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार विनायक राऊत यांनी याठिकाणी समितीमार्फत पाहणी केली जाईल, असे आश्वासन स्थानिकांना दिले होते. मात्र, आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतीही कमिटी दाखल झाली नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.यावेळी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेत राणे यांनी या घाट रस्त्यासंदर्भात माहिती घेतली. मुसळधार पावसातही बहुसंख्येने ग्रामस्थ या दौऱ्यावेळी उपस्थित होते.माजी खासदार नीलेश राणे यांनी आपण याबाबत राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर जमेल तेवढा प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Vinayak Rautविनायक राऊत