वेंगुर्ला : औषध क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. या व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी तसेच या प्रगत क्षेत्रात केमिस्ट बांधव टिकण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे केमिस्ट बांधवांनी या बदलांसह नवीन औषध कायदे आत्मसात करावेत. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी केमिस्ट असोसिएशन सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी केले.सिंधुदुर्ग केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा व गुणगौरव समारंभ वेंगुर्ला येथील स्वामिनी मंगल कार्यालयात झाला. यावेळी असोसिएशनचे सचिव संजय सावंत, उपाध्यक्ष विद्यानंद नाईक, खजिनदार विवेक आपटे, सहसचिव प्रसाद तेर्से, सहसचिव समीर खाडये, संघटन सचिव काशिनाथ तारी, प्रवीण नाईक आदी उपस्थित होते.केमिस्ट मुंबई झोनचे उपाध्यक्ष अनिल पाटकर, माजी अध्यक्ष दयानंद उबाळे, मनोहर कामत, मंगेश केळुसकर, दीपक परब, प्रवीण जोग, दत्तात्रय पारधिये, सचिन मुळीक, सुतार, अभय नाईक, राजेश सामंत, मकरंद कशाळीकर, तात्या दुबळे आदींनी प्रश्न मांडले. मारिया डिसिल्व्हा व नितीश नेरुरकर यांनी केमिस्ट विम्याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा बँकेचे राजेश दळवी यांनी बँकेच्या योजनांची माहिती दिली.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल वेंगुर्ला केमिस्ट असोसिएशनच्या विभा खानोलकर, आशिष पाडगावकर, प्रशांत नेरूरकर, सचिन भानुशाली, रोहित नाईक आदींचे उपस्थितांनी कौतुक केले.
नवीन औषध कायदे आत्मसात करण्याची गरज : आनंद रासम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 15:53 IST
बदलांसह नवीन औषध कायदे आत्मसात करावेत. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी केमिस्ट असोसिएशन सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी केले.
नवीन औषध कायदे आत्मसात करण्याची गरज : आनंद रासम
ठळक मुद्देनवीन औषध कायदे आत्मसात करण्याची गरज : आनंद रासमवेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा