शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

..अन्यथा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच्या दालनाला टाळे ठोकणार, अमित सामंत यांचा इशारा 

By सुधीर राणे | Updated: December 9, 2023 18:13 IST

आरोग्यसेवा चांगली; मग गोवा, कोल्हापूरला रुग्ण पाठवण्याचे केव्हा बंद होणार?

कणकवली: सिंधुदुर्गातआरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. जिल्हा रुग्णालयात महिलांची प्रसूती देखील होत नाही. मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्यसेवेसाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. अधिवेशनात जर आरोग्य मंत्री रुग्णव्यवस्था चांगली असल्याचे सांगत असतील. तर जिल्ह्यातील रुग्णांना कोल्हापूर किंवा गोवा या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्याची वेळ का येते? याचे उत्तर त्यांनी द्यावे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन सुनीता रामानंद यांची शासनाने तातडीने बदली करावी. तसेच रुग्णांना आवश्यक सुविधा जानेवारी पर्यंत न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस डीनच्या दालनाच्या दरवाजाला टाळे ठोकेल असा इशाराही दिला. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सामंत म्हणाले, महायुतीचे सरकार आरोग्यसेवा देताना अपयशी ठरत आहे. राष्ट्रवादीने जिल्हा रुग्णालयाकडे काही मागण्या केल्या होत्या. मात्र, डीन सुनीता रामानंद यांनी त्या पूर्ण  केलेल्या नाहीत. संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोडमडलेली आहे. जिल्हा रुग्णालयातून एक रुग्ण गोव्यात पाठवला, त्याला तिथे घेतले नाही. त्याला आता कोल्हापूरला अधिक उपचारासाठी पाठवावे लागले. अशी अनेक उदाहरणे आहेत. पालकमंत्री आणि सरकार याकडे लक्ष देणार का? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन यांना काम करायचे नाही. जिल्हा रुग्णालयाचा कारभार आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे राहिलेला नाही. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगूनही  सुनीता रामानंद यांनी आपला कारभार सुधारलेला नाही. त्यामुळे त्यांना ताबडतोब हटवून त्यांची बदली करावी. फक्त कागदावर रुग्ण सेवेबाबत अहवाल चांगला  दाखवून काय उपयोग ? रुग्णांना गोवा, कोल्हापूर पाठवण्याची वेळ का येते? तो अहवाल चुकीचा असल्याचा आरोप सामंत यांनी केला.पत्रकार परिषदेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष नजीर शेख, रुपेश जाधव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्यNCPराष्ट्रवादी काँग्रेसhospitalहॉस्पिटल