शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

'राष्ट्रीय क्रीडा दिन ' : कणकवली शहरातून जनजागृती रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 2:03 PM

मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन ' म्हणून देशभर उत्साहात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रात कार्यरत संघटनानी एकत्र येत गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरातून जनजागृती रॅली काढली. त्यामध्ये अनेक खेळाडू सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे'राष्ट्रीय क्रीडा दिन': कणकवली शहरातून जनजागृती रॅली!राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य ; खेळाडूंचा सहभाग

कणकवली : मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन ' म्हणून देशभर उत्साहात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रात कार्यरत संघटनानी एकत्र येत गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरातून जनजागृती रॅली काढली. त्यामध्ये अनेक खेळाडू सहभागी झाले होते.यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशन, आर्चरी संघटना सिंधुदुर्ग, तसेच सिंधुरत्न स्पोर्ट्स असोसिएशन अशा अनेक संघटनानी येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात एकत्र येत या जनजागृती रॅलीची सुरुवात केली. क्रीडा प्रेमी, खेळाडू, पालक व मान्यवर व्यक्ती या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.या रॅलीच्या सुरुवातीला भाजप नेते संदेश पारकर म्हणाले, इंटरनेट व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ हरवले आहेत. यापूर्वी शाळा सुटल्यावर विद्यार्थी मैदानात दिसायचे . मात्र, आता विद्यार्थी मोबाईल मध्ये जास्त गुंतलेले दिसतात.हे चित्र बदलण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.त्यानंतर जनजागृती रॅली बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे नगरपंचायत कार्यालयाकडे आली. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांचे सहकारी नगरसेवक कर्मचारी वर्ग यांनी या रॅलीचे स्वागत केले.यावेळी समीर नलावडे म्हणाले, नगरपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच विविध स्पर्धा घेण्याबरोबरच अद्ययावत बहुउद्देशीय हॉल निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही दिली.यावेळी खेळाडूंच्यावतीने नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे, आर्चरी असोसिएशनचे सदस्य विनायक उर्फ बाळू मेस्त्री , संदीप सावंत, नितीन तावडे, सुनील पाटील, क्रीडा शिक्षक अच्युत वणवे, डॉ. आराधना मेस्त्री, तायक्वांदो राष्ट्रीय पंच जयश्री कसालकर, रेखा धनवटे, अविराज खांडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरपंचायतीच्यावतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग