'राष्ट्रीय क्रीडा दिन ' : कणकवली शहरातून जनजागृती रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 02:03 PM2019-08-30T14:03:22+5:302019-08-30T14:04:55+5:30

मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन ' म्हणून देशभर उत्साहात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रात कार्यरत संघटनानी एकत्र येत गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरातून जनजागृती रॅली काढली. त्यामध्ये अनेक खेळाडू सहभागी झाले होते.

'National Sports Day': Awareness rally from Kankavali city! | 'राष्ट्रीय क्रीडा दिन ' : कणकवली शहरातून जनजागृती रॅली !

 कणकवली शहरातून गुरुवारी सायंकाळी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढण्यात आली.

Next
ठळक मुद्दे'राष्ट्रीय क्रीडा दिन': कणकवली शहरातून जनजागृती रॅली!राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य ; खेळाडूंचा सहभाग

कणकवली : मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन ' म्हणून देशभर उत्साहात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रात कार्यरत संघटनानी एकत्र येत गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरातून जनजागृती रॅली काढली. त्यामध्ये अनेक खेळाडू सहभागी झाले होते.

यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशन, आर्चरी संघटना सिंधुदुर्ग, तसेच सिंधुरत्न स्पोर्ट्स असोसिएशन अशा अनेक संघटनानी येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात एकत्र येत या जनजागृती रॅलीची सुरुवात केली. क्रीडा प्रेमी, खेळाडू, पालक व मान्यवर व्यक्ती या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

या रॅलीच्या सुरुवातीला भाजप नेते संदेश पारकर म्हणाले, इंटरनेट व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ हरवले आहेत. यापूर्वी शाळा सुटल्यावर विद्यार्थी मैदानात दिसायचे . मात्र, आता विद्यार्थी मोबाईल मध्ये जास्त गुंतलेले दिसतात.हे चित्र बदलण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

त्यानंतर जनजागृती रॅली बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे नगरपंचायत कार्यालयाकडे आली. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांचे सहकारी नगरसेवक कर्मचारी वर्ग यांनी या रॅलीचे स्वागत केले.

यावेळी समीर नलावडे म्हणाले, नगरपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच विविध स्पर्धा घेण्याबरोबरच अद्ययावत बहुउद्देशीय हॉल निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

यावेळी खेळाडूंच्यावतीने नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे, आर्चरी असोसिएशनचे सदस्य विनायक उर्फ बाळू मेस्त्री , संदीप सावंत, नितीन तावडे, सुनील पाटील, क्रीडा शिक्षक अच्युत वणवे, डॉ. आराधना मेस्त्री, तायक्वांदो राष्ट्रीय पंच जयश्री कसालकर, रेखा धनवटे, अविराज खांडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरपंचायतीच्यावतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
 

Web Title: 'National Sports Day': Awareness rally from Kankavali city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.