शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नाटळ तंटामुक्ती अध्यक्षाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 15:36 IST

कणकवली: नाटळ तंटामुक्ती अध्यक्षपदाचा राजीनामा दे नाहीतर जीवेमारीन अशी धमकी देत चिव्याच्या दांड्याने व लोखंडी सळीने मारहाण केल्याप्रकरणी कणकवली ...

कणकवली: नाटळ तंटामुक्ती अध्यक्षपदाचा राजीनामा दे नाहीतर जीवेमारीन अशी धमकी देत चिव्याच्या दांड्याने व लोखंडी सळीने मारहाण केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात नाटळ येथील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची तक्रार तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मारुती सावंत (३३, रा. नाटळ खांदारेवाडी) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार किशोर विठ्ठल परब, किरण किशोर परब, महेश महादेव खांदारे (तिघेही रा. नाटळ, खांदारेवाडी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.गणेश सावंत यांची एक वर्षांपूर्वी नाटळ तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी किशोर परब हे इच्छुक होते. तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड न झाल्याने त्यांच्या मनात राग निर्माण झाला होता. दोन महिन्यापूर्वी त्यांनी गणेश सावंत यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात धमकी दिली होती. मात्र गणेश सावंत यांनी या संदर्भात कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती. सोमवारी रात्री गणेश सावंत हे जेवण करून घराबाहेर फिरण्यासाठी गेले असताना किशोर परब, किरण परब, महेश खांदारे यांनी शिवीगाळी करत चिव्याचा दांडा व लोखंडी सळीने गणेश सावंत यांच्यावर हल्ला केला. यात गणेश सावंत यांच्या हनवटीला जखम झाली असून डाव्या हाताला मुका मार लागला आहे. तसेच किरण परब याने १५ दिवसात तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा राजीनामा दे नाहीतर तुला जीवे मारू अशी धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस