शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शिवसेना संपविण्याचा कट रचला; शिवसैनिक कदापि सोडणार नाहीत - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:46 IST

शिवसेनेच्या पाठीत वार केले

कणकवली: सिंधुदुर्गातील दहशतवाद आम्‍ही यापूर्वीच गाडून टाकलाय. तरीही शिवसैनिकांवर हल्‍ले झाले तर पुन्हा एकदा कनेडी पॅर्टन दाखविल्‍याशिवाय राहणार नाही. शिवसेना संपविण्याचा कट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी रचला आहे. मात्र,शिवसेना संपविण्यासाठी ज्‍यांनी ज्‍यांनी प्रयत्न  केले त्‍यांना शिवसैनिक कधीही सोडणार नाहीत.असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी येथे केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गुरुवारी सकाळी लागलेल्या 'इलाका तेरा ,धमाका मेरा' या बॅनर नंतर या दौऱ्याची उत्सुकता लागून राहिली होती.  कणकवलीत आल्यानंतर संजय राऊत यांनी  राणेंसह शिंदे गटावर देखील टीका केली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी महापौर दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे, राजू राठोड, सचिन सावंत, जान्हवी सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, उमेश वाळके, शिल्पा खोत, तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.संजय राऊत म्‍हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली. अनेक माणसांना त्‍यांनी सरदार बनवले. परंतु काहींनी शिवसेनेच्या पाठीत वार केले. आता तर शिवसेना संपविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर वार केले आहेत. कोकणातील माणसांनी, चाकरमान्यांनी रक्‍ताचे पाणी करून शिवसेना वाढवली. खरे तर  शिवसेना या चार नावामुळे आम्‍ही सर्व नेतेमंडळी नावारूपाला आलो. राणे, शिंदे यांनाही शिवसेनेमुळेच ओळख मिळाली. केंद्र आणि राज्‍यातील भाजप आघाडीचं सरकार सुडाचे राजकारण करतंय. मला तुरूंगात टाकले. शिवसेनेत राहिलेल्‍या आमदारांवर खोटे खटले दाखल केले जात आहेत. आमदारांची चौकशी केली जातेय. पण जे सरकार भ्रष्‍टाचारातून उभे राहिले ते आमच्या आमदारांची काय चौकशी करणार?राज्‍याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील जेवणावळीवर तीन महिन्यात तब्‍बल ३ कोटी रूपये खर्च झाला आहे.  माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे.उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, वसंतराव नाईक ११ वर्षे मुख्यमंत्री होते. पण जेवणावळीवर तीन कोटींचा खर्च करणारे शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत असेही संजय राऊत म्हणाले.यावेळी विनायक राऊत, वैभव नाईक , दत्ता दळवी, सतीश सावंत, जान्हवी सावंत,अतुल रावराणे, संदेश पारकर यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहShiv Senaशिवसेना