शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर

By अनंत खं.जाधव | Updated: March 26, 2024 12:30 IST

राणेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेवर घेतले नाही.याचा अर्थ त्यांना लोकसभेवर संधी द्याची असेल जर त्यांना संधी दिली तर राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने केंद्रातून मोठ्याप्रमाणात निधी मिळेल असे म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून राणेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी केसरकर यांनी किरण सामंत यांचा लोकसंपर्क दाडगा आहे.त्यामुळे कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आपण प्रत्येक गावात जाऊन प्रचार करणार असेही स्पष्ट केले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,रूपेश पावसकर उपस्थित होते.केसरकर म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षासाठी उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे. आम्हीही जागा शिवसेनेसाठी मिळावी यासाठी आग्रही आहोत. पराभव डोळ्यासमोर असल्याने ठाकरे गटाकडे न मागता उमेदवारी जाहीर होते. मात्र निवडून येणाऱ्या जागेसाठी अनेकजण इच्छुक असतात. आमच्याकडेही महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात उशीर होत आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांनी गेल्या  १० वर्षात कोणतेही विकास काम केले नाही. त्यामुळे येथील जनतेत त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यावेळी आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळेच व आमच्या मदतीमुळेच ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांना उपकाराची जाण नसल्यानेच व पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने ते आता आमच्याविरोधात बेताल बडबड करीत आहेत. भाषणं करून काहीही बोलून टाळ्या घेणं सोपं असतं. लवकरच त्यांच्याकडे एवढा वेळ असेल की त्यांना केवळ भाषण करीतच फिरावं लागेल, असा टोला ही केसरकर यांनी लगावला तसेच राऊत यांचा पराभव निश्चित असल्याचे सांगितले. पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विनायक राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळेच ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंडळींना एकत्र करून गोळा बेरीज करण्याचा  प्रयत्न करीत आहेत. सध्या शिमगोत्सव सुरू आहे. आरोपांचा हा धुरळा केवळ काही दिवसांपुरता आहे. शिमगोत्सव आठ ते पंधरा दिवस चालतो. धुरळा एकदाचा खाली बसल्यावर राऊत खरे काय आहेत हे येथील जनतेला समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

महिलांवर होणारा अन्याय दूर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेते असून त्यांची आज देशाला गरज आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा निर्णयामुळे तेथे लोकशाही प्रस्थापित झाली. तीन तलाख विरोधातील कायदा करून मुस्लिम महिलांवर होणारा अन्याय त्यांनी दूर केला. 

जनतेला मोफत धान्यआज देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वितरित केले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा होत आहे.  त्यांच्या अशा निर्णयांमुळेच पाकव्याप्त काश्मीर मधील लोक भारतात येण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. लोकशाही नेत्यावर जनतेचा विश्वास असावा लागतो. लोकांची मन जिंकता आली तरच तुम्ही जिंकू शकता. त्यामुळे देशातील जनता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भरभरून मतदान करेल असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे lok sabhaलोकसभाDipak Kesarkarदीपक केसरकर