शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: अर्थमंत्री येऊन पराभव करुन जातात, ही यांची अक्कल; नारायण राणेंचा अजित पवारांना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:33 IST

Narayan Rane: संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती.

सिंधुदुर्ग-

संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज भाजपानं बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राणेंनी ठाकरे सरकार आणि अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

"सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर करुन जिंकण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस यंत्रणेला हाताळी बाळगून निवडणूक जिंकण्याचा मानस कोकणवासियांनी फोल ठरवला आहे. नितेश राणेंचा जामीन अर्ज चार चार दिवस कोर्टात चालतो. माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. इथं डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थमंत्री येऊन अक्कल काढतात आणि पक्षाचा पराभव करुन जातात", असा टोला नारायण राणे यांनी लगावला. 

"आम्ही अक्कल वापरुच निवडणूक जिंकली. जनतेनं पण अक्कल वापरुनच मतदान केलं आणि अक्कल असणाऱ्यांनाच सत्ता दिली. तर अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला", असाही खोचक वार नारायण राणे यांनी अजित पवारांचं नाव न घेता केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आले होते. यावेळी त्यांनी बँक आणि संस्था चालवण्यासाठी, टिकवण्यासाठी अक्कल लागते, असं विधान केलं होतं. याच विधानाचा राणेंनी आज निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाचार घेतला. 

अमित शहांना सर्व रिपोर्ट देणारगेल्या चार दिवसांत कोकणात काय काय झालं. कसा सत्तेचा, कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर केला गेला याची इत्यंभूत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचंही नारायण राणे यावेळी म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून जो काही प्रकार सुरू होता त्यातून महाविकास आघाडी सरकार किती अस्वस्थ आहे हेच दिसून येत होतं. अखेर आज त्यांना त्यांची जागा कळाली आहे, असंही राणे म्हणाले. 

राज्याला भाजपाचा मुख्यमंत्री हवाआता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान केलं. सध्याचा कोरोना काळ, खुंटलेली आर्थिक प्रगती यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी चांगला मुख्यमंत्री आणि चांगलं सरकार गरजेचं आहे. आम्हाला आता भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, यांच्यासारखी 'लगान' टीम नको, असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ajit Pawarअजित पवारsindhudurgसिंधुदुर्ग