शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

नाणार प्रकल्प होणार...; मालवण येथे भाजपच्या आनंद मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 12:17 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पंचतारांकित हॉटेल होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

मालवण : महाराष्ट्र राज्यातील आमचे युतीचे सरकार कोकणाकडे विशेष लक्ष देणार आहे. यामुळेच काही दिवसांनी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरभरून तरतूद केली जाईल. कोकणातील बेरोजगारी दूर होण्यासाठी नाणार प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आयोजित आनंद मेळाव्यात केले. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सुदृढ बनविणारा नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत आमचे सरकार साकारणार आहे. कोकणातील बेरोजगारी दूर करावयाची असल्यास नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे. हे स्वप्न आमचे सरकार पूर्ण करील. सिंधुदुर्गात चिपी विमानतळ साकारला याचे पूर्ण श्रेय नारायण राणे यांना दिले पाहिजे. आपण मुख्यमंत्री असताना या विमानतळातील त्रुटी दूर केल्या व हा प्रकल्प सुरू केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या विमानतळासाठी काहीही न करता विमानतळाचे दुसऱ्यांदा उद्घाटन मात्र केले. कोकणात क्यार वादळात कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काहीही मदत दिली नाही. आपण मुख्यमंत्री असताना कोकणातील रस्ते, मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला. इथला काजू बोंड फुकट जात आहे. त्यावर प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यात आणला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.मेळाव्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

पंचतारांकित हॉटेल ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पंचतारांकित हॉटेल होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा