नाणार प्रकल्प होणार...; मालवण येथे भाजपच्या आनंद मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:17 PM2023-02-06T12:17:01+5:302023-02-06T12:17:44+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पंचतारांकित हॉटेल होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Nanar project will be...; Deputy Chief Minister's assurance at BJP's Anand Mela in Malvan | नाणार प्रकल्प होणार...; मालवण येथे भाजपच्या आनंद मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नाणार प्रकल्प होणार...; मालवण येथे भाजपच्या आनंद मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Next

मालवण : महाराष्ट्र राज्यातील आमचे युतीचे सरकार कोकणाकडे विशेष लक्ष देणार आहे. यामुळेच काही दिवसांनी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरभरून तरतूद केली जाईल. कोकणातील बेरोजगारी दूर होण्यासाठी नाणार प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आयोजित आनंद मेळाव्यात केले. 

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सुदृढ बनविणारा नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत आमचे सरकार साकारणार आहे. कोकणातील बेरोजगारी दूर करावयाची असल्यास नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे. हे स्वप्न आमचे सरकार पूर्ण करील. सिंधुदुर्गात चिपी विमानतळ साकारला याचे पूर्ण श्रेय नारायण राणे यांना दिले पाहिजे. आपण मुख्यमंत्री असताना या विमानतळातील त्रुटी दूर केल्या व हा प्रकल्प सुरू केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या विमानतळासाठी काहीही न करता विमानतळाचे दुसऱ्यांदा उद्घाटन मात्र केले. कोकणात क्यार वादळात कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काहीही मदत दिली नाही. आपण मुख्यमंत्री असताना कोकणातील रस्ते, मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला. इथला काजू बोंड फुकट जात आहे. त्यावर प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यात आणला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मेळाव्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

पंचतारांकित हॉटेल ! 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पंचतारांकित हॉटेल होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Nanar project will be...; Deputy Chief Minister's assurance at BJP's Anand Mela in Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.