शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Sindhudurg Crime: मृतदेहाची विल्हेवाट लावायला आंबोलीत आला, अन् स्व:ताच दरीत कोसळला

By अनंत खं.जाधव | Updated: January 31, 2023 19:46 IST

पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु

आंबोली : सातारा जिल्ह्यातील कराड येथील युवकाने पंढरपूर येथील आपल्या मित्राला दिलेल्या पैशावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पंढरपूर येथील मित्राचा मृत्यू झाला. तो मृतदेह मित्राला सोबत घेऊन आंबोली घाटात टाकण्यासाठी आल्यावर पाय घसरून दरीत पडून कराडमधील युवकाचाही मृत्यू झाला.ही नाट्यमय घटना या घटनेतील तिसऱ्या साक्षीदार युवकाने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या साहाय्याने दोन्ही मृतदेह दरीतून काढले. सोमवारी रात्री घडलेली ही घटना मंगळवारी उघडकीस आली.कराड येथील भाऊसो अरुण माने (३०) याने वीट कामगारांचा पुरवठा करण्यासाठी पंढरपूर येथील आपला मित्र सुशांत खिल्लारे (२८) याच्यासमवेत आर्थिक व्यवहार केले होते. जी रक्कम काही लाखांमध्ये होती. ही रक्कम सुशांतला दिली होती. परंतु वर्षभर तो पैसे परत देत नव्हता व सांगितलेले कामही करत नसल्याने भाऊसो यांनी रविवारी सुशांत खिल्लारे याला पंढरपूर येथून कराड येथे निर्जनस्थळी बोलावून घेतले. यावेळी मित्र तुषार पवार (२८) त्यांच्यासोबत होता.आपल्या व्यवहाराचे काय झाले ? असे विचारणा करत बेदम मारहाण केली यात सुशांतचा मृत्यू झाला. हे पाहून त्यांनी मृतदेह घरातच ठेवला. याच परिस्थितीत दोघेही घाबरल्यामुळे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गाठण्याचे ठरवले व ते मृतदेहासह कराडहून सोमवारी रात्री आंबोली घाटात पोहोचले.आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंधारात मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर काढला व संरक्षक कठड्यावर उभे राहिले. मृतदेह फेकताना सुशांतचा मृतदेह तर खाली फेकला गेलाच परंतु त्याच वेळेस तोल गेल्याने भाऊसो माने सुद्धा दरीमध्ये कोसळला . तुषार मात्र यातून बचावला त्याने स्वतःला सावरले.रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढलेतुषारने दरीत कोसळलेला आपला मित्र भाऊसो याला हाका मारल्या. परंतु कोणताही उपयोग झाला नाही. तुषार याने चालू असलेली गाडी तशीच पुढे पूर्वीचा वस मंदिर येथे आणली व गाडी बंद केली. यानंतर तुषारने घडलेला प्रकार भाऊसो याच्या नातेवाइकांना सांगितला. त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना माहिती दिली.मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आंबोली पोलिसांना याबाबत कराड पोलिसांकडून माहिती देण्यात आल्यानंतर तत्काळ आंबोली पोलिस व आंबोली रेस्क्यू टीम मार्फत घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळी शोधत असताना रेस्क्यू टीमला दोन मृतदेह आढळून आले, सायंकाळी चार वाजेपर्यंत दोन्ही मृतदेह वर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले.

शोध पथकात यांचा समावेशयावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक अमित गोते, आंबोली पोलिस हवालदार दत्तात्रय देसाई, पोलिस कॉन्स्टेबल दीपक नाईक, दीपक शिंदे तसेच आंबोली रेस्क्यू टीमचे मायकल डिसूजा, उत्तम नार्वेकर, हेमंत नार्वेकर, विशाल बांदेकर, संतोष पालेकर, राजू राऊळ, अजित नार्वेकर आधी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस