शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

झोपेतच दांड्याने ठेचून पोटच्या पोराने केली जन्मदात्रीसह भावाची हत्या, सिंधुदुर्गातील देवगड-बापार्डे येथील धक्कादायक घटना 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 14, 2023 17:15 IST

पत्नीचाही केला होता खून

देवगड : देवगड तालुक्यात बापार्डे बौद्धवाडी येथील भारत मुरारी सकपाळ (५०) याने दारूच्या नशेत मध्यरात्री आई व व भाऊ याचा दांड्याने ठेचून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास समोर आली. आई शोभा मुरारी सकपाळ (वय-७५) व मोठा भाऊ महेंद्र मुरारी सपकाळ (५५) अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी देवगड पोलिस दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. भारत मुरारी सकपाळ (वय-५० रा. बापर्डे बौद्धवाडी) असे त्याचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी की, भारत सकपाळ याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेतच त्याचा घरामध्ये आई व भाऊ यांच्याबरोबर वाद झाला होता. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास आई शोभा सकपाळ व मोठा भाऊ महेंद्र सपकाळ यांची झोपेत असताना दांड्याने ठेचून खून केला.दररोज सकाळी पाच वाजता उठणाऱ्या शोभा सकपाळ व त्यांच्या घरातली मंडळी अजून का उठली नाही म्हणून ग्रामस्थांनी याची माहिती गावचे सरपंच व पोलिस पाटील यांना दिली. सरपंच व पोलिस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता आई व मुलगा मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी भारत हा घरात नसल्याने त्याची शोधाशोध केली असता तो  जंगलात सापडला.

यावेळी त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनीच आई व भावाचा खून केला असल्याची कबुली  दिली. त्यानंतर सरपंच व पोलिस पाटील यांनी तात्काळ ही घटना पोलिसांना कळविली त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अन् संशयित भारत सकपाळ याला ताब्यात घेतले.२००७ मध्ये पत्नीचा केला होता खूनभारतने यापूर्वीही दारूच्या नशेत २००७ साली पत्नीचा हेल्मेटच्या साहाय्याने खून केला होता. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. पत्नीचा खून केल्यानंतर त्याची मुले दोन्ही मुलं आजोळी आपल्या मामाकडे राहत असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस