शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Crime: किनळे येथील अंगणवाडी सेविकेचा खून दागिन्यांसाठीच, आरोपीची कबुली

By सुधीर राणे | Updated: March 5, 2025 13:21 IST

अन्य कोणतेही कारण नसल्याचे केले स्पष्ट

कणकवली: सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सुभाष सोपटे (५९) हिचा खून दागिन्यांसाठीच केला असल्याची कबुली संशयित आरोपी वितोरीन रुजाय फर्नांडीस (रा. वेंगुर्ले, आरवली-टांक) याने पोलिस तपासा दरम्यान दिली आहे. डोक्यात दुचाकीच्या शॉकप्सरचा लोखंडी रॉड मारून तिला ठार मारल्याचेही तो सांगत आहे.ओसरगाव येथे मुंबई-गोवा महामार्गानजीक सुचिता सोपटे हिला आणून सायंकाळी ७.३०वाजण्याच्या सुमारास तिच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला आणि ती मेल्याची खात्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. महिलेच्या डोक्यावर त्याने मारलेला रॉड आणि जाळण्यासाठी वापरलेले पेट्रोलचे कॅन या वस्तू तिचा खून करून वेंगुर्लेकडे परत जाताना कसाल पुलाखाली टाकले होते. ते कॅन आणि तो रॉड पोलिसांनी हस्तगत केला आहे. तपासा दरम्यान आरोपीने महिलेचे घेतलेले दागिने, तिचे दोन मोबाईल पोलिसांनी त्याच्या घरातून हस्तगत केले आहेत. तसेच सोनाराकडे विकलेले दागिनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. खून झाला त्या घटनेच्या आदल्यादिवशी आरोपी महिलेला घेवून कोल्हापूरला गेला होता. त्यामुळे तो कोल्हापूरला का गेला होता याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला तिकडे नेवून तपास केला आहे. या तपासात अनेक बाबी पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांच्याच हव्यासापोटी केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. सुचिता सोपटे आणि आरोपीची पूर्वीपासून ओळख होती. कोल्हापूरला ती गेली होती परंतू तसे महत्वाचे असे काहीच काम नव्हते. कोल्हापूरला ते गेल्याचे आणि तेथून परत आल्याचे आंबोली येथील तपासणी नाक्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट झाले आहे. त्यानंतर ते दोघे कुडाळला आले. तेथील एका लॉजमध्ये सुचिता सोपटे हि राहिली तर आरोपी आपल्या गाडीने घरी निघून गेला. तेही सीसीटिव्ही फुटेज सापडले आहे. तर घटना घडली त्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सकाळी तो तिला नेण्यासाठी परत लॉजवर आला होता.त्यानंतर ते मालवणसह अनेक ठिकाणी फिरले. सायंकाळी तो तिला घेवून ओसरगाव येथे आला. त्या महिलेचे काही दागिने त्याच्याकडे होते. हे दागिने तिने आपल्या जावेकडून घेतले होते. कदाचित त्या महिलेने दागिने देण्यासाठी तगादा लावला असेल आणि त्या रागातून आरोपीने तिला ओसरगाव येथे आणून तिचा खून केला असेही तपासात पुढे येत आहे.खुनात आणखी कोणाचा सहभाग?  आरोपीने सुचिता सोपटे हिचा खून केला असला तरी त्यापूर्वीच खूनाचा कट रचला नव्हता, असेही त्याने पोलिसाना  सांगितले आहे.या खुनात आणखी कोणाचा सहभाग होता का? याबाबत पोलिस तपास करत आहेत. दरम्यान,आणखी तीन दिवस आरोपी पोलिस कोठडीत असल्याने अन्य काही मुद्दे तपासात समोर येण्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस