शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
4
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
5
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
6
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
7
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
8
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
9
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
10
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
11
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
12
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
13
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
14
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
15
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
16
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
17
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
20
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?

गुलदार युद्धनौका 'या'ठिकाणी स्थापित करण्याच्या हालचाली; वेंगुर्ला, मालवण येथील व्यावसायिकांमधून नाराजी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 27, 2025 18:52 IST

संदीप बोडवे मालवण : निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू ...

संदीप बोडवेमालवण : निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली आहे. दरम्यान, गेली सात वर्ष वाट पाहत असलेल्या वेंगुर्ला आणि मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया येथील पर्यटन व्यावसायिकांमधून उमटू लागल्या आहेत.मालवण आणि वेंगुर्ला परिसरात भोगवे, निवती, देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनवाढीस वाव आहे. या भागातील पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा यासाठी येथे एखादा नावीन्य पूर्ण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी येथील पर्यटन व्यावसायिकांची मागील १०-१२ वर्षांपासूनची मागणी होती. याच मागणीचा विचार करता निवती रॉक समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका स्थापित करून तिथे पाणबुडी प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मागील सहा-सात वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आणि पाणबुडी प्रकल्पाला केंद्राने निधीची तरतूद करत हिरवा कंदील दाखविला होता.

किनाऱ्यापासून तीन किलोमीटरवरकुणकेश्वर समुद्रात किनाऱ्यापासून तीन किलोमीटर लांब २० मीटर खोल समुद्रात गुलदार युद्धनौका स्थापित करण्याचे ठरले आहे. यासंदर्भातील एक पत्र महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पाठविण्यात आले आहे. या पत्रात गुलदार स्थापित करण्याच्या जागेत अंशतः बदल करण्यात आला असून, निवती रॉकऐवजी कुणकेश्वर येथील समुद्रातील जागेची निवड करण्यात आली आहे. असे म्हटले आहे.

जागा बदलण्याने नाराजीचा सूरनिवती रॉक समुद्रात राबविण्यात येणारा आणि मागील अनेक वर्षांची मागणी असलेला अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशल रीफ आणि पाणबुडीचा प्रकल्प तडकाफडकी कुणकेश्वरला होणार असल्याची माहिती मिळताच मालवण आणि वेंगुर्ला येथील पर्यटन व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नव्या जागेच्या शोधात..निवती रॉक येथील समुद्राच्या पाण्याखालील प्रकल्प कुणकेश्वर येथे हलविण्याच्या संदर्भाने पर्यटन विभागाचे सचिव अतुल पाटणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या मदतीने नव्या जागेच्या शोधात आहोत, अशी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गindian navyभारतीय नौदलtourismपर्यटनSea Routeसागरी महामार्गMalvan beachमालवण समुद्र किनारा