शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पालिकेत समित्यांसाठी हालचाली

By admin | Updated: November 11, 2014 00:04 IST

इच्छुकांत रस्सिखेच : पाणीपुरवठा, बांधकामसाठी जोरदार स्पर्धा

राजाराम पाटील - इचलकरंजी -विधानसभा निवडणूक आणि दीपावलीनंतर आता नगरपालिकेतील राजकारणाला वेग येऊ लागला असून, विविध विषय समित्यांच्या आगामी निवडणुकींच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉँग्रेसमध्ये पाणीपुरवठा समितीसाठी, तर राष्ट्रवादीमध्ये बांधकाम समितीसाठी इच्छुकांची स्पर्धा आहे. दरम्यान, कॉँग्रेसकडून बांधकाम समितीची मागणी करण्याच्या हालचाली सुरू असून, त्या बदल्यात राष्ट्रवादी उपनगराध्यक्षपद मागण्याच्या पवित्र्यात आहे.पालिकेमध्ये कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर आहे. सत्तेतील वाटपानुसार कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य समिती व महिला-बालकल्याण समित्या आहेत. राष्ट्रवादीकडे बांधकाम व शिक्षण समिती आहे. या समित्यांची एक वर्षाची मुदत डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपुष्टात येत आहे.विधानसभा निवडणूक कालावधीत आचारसंहितेमुळे पालिकेतील राजकारण ठप्प होते, तर या निवडणुकीपाठोपाठ आलेल्या दीपावली सणामुळे पालिकेतील हालचाली थंडावल्या होत्या. आता आगामी डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बदललेले संदर्भ पाहता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. यापैकी जांभळे गटाकडे सहा व कारंडे गटाकडे पाच नगरसेवक आहेत. आतापर्यंत बांधकाम समिती जांभळे गटाकडेच असल्याने आता कारंडे गटास बांधकाम समिती मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे. बांधकाम समिती कारंडे गटाकडे गेल्यास पालिकेतील जांभळे गटाचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. विधानसभेला प्रकाश आवाडे यांना हार पत्करावी लागली; पण निवडणुकीमध्ये आवाडे यांना ज्या परिसराने मताधिक्य दिले, त्या परिसरातील नगरसेवकाला समित्यांचे सभापतिपद देण्याचा विचार पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पालिकेचे राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.