शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: ट्रकची कारला भीषण धडक, अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 9, 2023 15:19 IST

शिरगाव ( सिंधुदुर्ग ): देवगड नांदगाव मार्गावर तोरसोळे फाटा येथील वळणावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील ...

शिरगाव (सिंधुदुर्ग): देवगड नांदगाव मार्गावर तोरसोळे फाटा येथील वळणावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तळेबाजार येथील महेश तोरसकर (वय-५२) आणि त्यांची आई मनिषा तोरसकर (७५) अशी मृत दोघांची नावे आहेत. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज, शनिवारी सकाळी घडला.तळेबाजार येथील व्यापारी महेश तोरसकर हे कार क्रमांक (एम.एच-०७-क्यू-३८५०) मधून कसाल येथील आपल्या नातेवाईकांकडे अंत्यविधीसाठी जात होते. दरम्यान देवगड नांदगाव मार्गावर तर तोरसोळेफाटा येथे वळणावर समोरून येणाऱ्या (सीजी ०५ डीएफ ९८१६) या १४ चाकी ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत कारमधील महेश आणि त्याची आई मनिषा तोरसकर हे जागीच ठार झाले. तर श्रद्धा गुरुनाथ पारकर (वय-५५) व गुरुनाथ श्रीपाद पारकर (६०) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. देवगड नांदगाव मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जेसीबीच्या सहाय्याने गटारातील अपघातग्रस्त चारचाकी बाहेर काढण्यात आली. संतप्त ग्रामस्थांनी चिरे खाणीवर जाणारे ट्रक अडवून ते रिकामे माघारी पाठवून आपला राग व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील तपास सुरु केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू