तोंडवली ग्रामसचिवालय जिल्ह्यामध्ये एक आदर्श ठरेल: विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:21 IST2019-02-19T15:20:23+5:302019-02-19T15:21:47+5:30
जनसुविधा योजनेंतर्गत १२ लाख रुपये मंजूर झालेल्या तोंडवली -बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन होत आहे. हे ग्रामसचिवालय जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामसचिवालय ठरेल. यासाठी लागणारा निधी आपण कमी पडू देणार नसल्याची ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली.

तोंडवली-बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमीपूजन खासदार विनायक राऊत व जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विलास साळसकर, शैलेश भोगले, अॅड. हर्षद गावडे, राजू राठोड आदी उपस्थित होते.
कणकवली : जनसुविधा योजनेंतर्गत १२ लाख रुपये मंजूर झालेल्या तोंडवली -बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन होत आहे. हे ग्रामसचिवालय जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामसचिवालय ठरेल. यासाठी लागणारा निधी आपण कमी पडू देणार नसल्याची ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली.
तोंडवली -बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमीपूजन खासदार विनायक राऊत व जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खासदार राऊत बोलत होते.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, विधानसभा संघटक सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शिवसेना कायदेविभाग जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, युवासेना जिल्हासमन्वयक राजू राठोड, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, उपविभागप्रमुख उत्तम ओटवकर, सरपंच सुप्रिया रांबाडे, उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी, माजी सरपंच अनंत बोभाटे, दीपक कांडर, युवासेना उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री, सिध्देश राणे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,ग्रामसेवक सचिन पवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत पुढे म्हणाले, तोंडवली बावशी ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सहा सदस्य असून विकासकामांसाठी येथील सरपंच सुप्रिया रांबाडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने येथील विकासकामांना वेगवेगळ्या योजनेतून निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये बावशी गावठाण रस्ता १० लाख रुपये, बावशी धनगरवाडी नळ योजना पाईप लाईन २. ५ लाख रुपये, बावशी गावठाण बोअरवेल १ लाख रुपये, तोंडवली पावणादेवी रस्ता ७ लाख रुपये, बावशी दलितवस्ती साकव ३० लाख, तोंडवली कुडतरकरवाडी १० लाख रुपये आदी कामे पूर्ण झाली आहेत. या गावाच्या विकासासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील .असेही खासदार राऊत यावेळी म्हणाले.