शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मोड यात्रेने आंगणेवाडी यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:24 IST

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची मंगळवारी मोड यात्रेने सांगता झाली. यात्रोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या महाप्रसादाची ताटे लावणे या धार्मिक विधीला जनसागर उसळला आणि रात्री गर्दीने उच्चांक गाठला.

ठळक मुद्देमोड यात्रेने आंगणेवाडी यात्रेची सांगतागर्दीने गाठला उच्चांक

सिंधूदुर्ग :  आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची मंगळवारी मोड यात्रेने सांगता झाली. यात्रोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या महाप्रसादाची ताटे लावणे या धार्मिक विधीला जनसागर उसळला आणि रात्री गर्दीने उच्चांक गाठला.सोमवारी पहाटे २ वाजल्यापासून आंगणेवाडी यात्रोत्सवास सुरुवात झाली. दिवसभर भाविकांची रीघ सुरू होती. सूर्य मावळतीकडे गेला आणि आंगणेवाडीकडे जाणारे सर्वच रस्ते गाड्यांनी भरून गेले. दिवसभरापेक्षा रात्रौ सिंधुदुर्गातील भाविकांनी यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी धाव घेतली.

मंदिरावर तसेच संपूर्ण आंगणेवाडीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने छोटासा आंगणेवाडी गाव एखाद्या नव्या नवरीप्रमाणे नटल्यासारखा दिसत होता. रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास यात्रेचा परमोच्च बिंदू मानला गेलेला देवीला महाप्रसादाची ताटे लावण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यामुळे रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत दर्शन थांबविण्यात आले होते. आंगणेवाडीत आंगणे कुटुंबियांप्रमाणे इतर ग्रामस्थांनी महिला वर्गासमवेत महाप्रसादाची ताटे घेऊन येण्यास सुरुवात केली. डोईवर महाप्रसादाची ताटे घेऊन आंगणेवाडीच्या माहेरवाशिणी लगबगीने येत होत्या. चार पाच जणांच्या गटाने मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना ताटे लावण्यासाठी सोडण्यात येत होते.

देवीला महाप्रसाद दाखवून माहेरवाशिणी मंदिरातून बाहेर पडत होत्या. देवीला प्रसाद दाखविल्यानंतर घरोघरी भाविकांना महाप्रसादाचे वाटप कारण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री १ वाजल्यानंतर ओटी भरण्याचा आणि दर्शनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्यामुळे पुन्हा भाविकांचा दर्शनाचा ओघ सुरु झाला. यावर्षी दर्शनासाठी नऊ रांगांची सोय करण्यात आल्याने भाविकांना देवीचे दर्शन सुलभपणे झाले. रात्री भाविकांनी यात्रेत मोठी गर्दी केल्याने गर्दीने उच्चांक गाठला.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोड यात्रेला भाविकांनी गर्दी केली होती. मोड यात्रेत दर्शनाबरोबरच भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटला. सायंकाळपर्यंत दर्शनाची रांग सुरु होती. यावर्षीही एसटी महामंडळाने अव्याहत पणे बस सेवा सुरू ठेवली होती. तर वीज पुरवठाही सुरळीत सुरु होता.

पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही. सायंकाळी तुलाभाराचा कार्यक्रम बंद करण्यात आला.या यात्रोत्सवात पाळणे, टॉयट्रेन, मौत का कुआ हे आणि इतर साहसी खेळ बच्चे कंपनीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. रात्रौ या खेळांना बच्चे कंपनीबरोबरच मोठ्यांनीही उपस्थिती दर्शवित आनंद लुटला. या यात्रोत्सवात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीsindhudurgसिंधुदुर्ग