शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मोबाइल चोरला अन् चोरटा जाळ्यात अडकला; कणकवलीत चोरी करणाऱ्या चोरट्यास पणजीत घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:38 IST

एलसीबी व कणकवली पोलिस पथकाने अवघ्या १६ तासात चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

कणकवली: शहरातील कनकनगर येथील समृद्धी मिलिंद कोरगावकर यांच्या घरफोडीचा छडा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलिसानी  लावला असून अवघ्या १६ तासांत चोराला गजाआड केले आहे. चोरट्याने चोरलेल्या मोबाईलचे पणजी येथे मिळालेले लोकेशन आणि सीसीटीव्हीचा आधार घेत  संतोष वसंत सुतार (४८, रा. संगमेश्वर ,जि.रत्नागिरी) याला  ताब्यात घेतानाच साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व अन्य चांदीचा ऐवज पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि कणकवली पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले , उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल हाडळ, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, समीर भोसले, पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे, डॉमनिक डिसोझा,  जॅक्सन घोंसालवीस,आशिष जामदार आदींच्या पथकाने केली. कनकनगर येथील रहिवासी परिचारिका समृद्धी मिलिंद कोरगावकर या शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात  ७ जून रोजी रात्रपाळीसाठी कामावर गेल्या होत्या. तर त्यांचे पती मिलिंद हे आपल्या वडील आणि मुलासोबत मालवण येथील बहिणीकडे गेले होते. ८ जून रोजी सकाळी पावणे नऊ वाजता ड्युटीवरून परत आल्यानंतर समृद्धी कोरगावकर याना आपल्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरी झालेली दिसली. सोन्याचे व चांदीचे दागिने असा सात लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे समृद्धी कोरगावकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सीसीटीव्ही फुटेजचा फायदा !समृद्धी कोरगावकर यांच्या घरात चोरी झाल्यानंतर या चोरीतील आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला होता. पोलिसांनी या सीसीटीव्हीचा आधार घेत चोरट्याचा शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनमुळे चोरटा सापडला! चोरट्याने समृद्धी कोरगावकर यांच्या घरातील एक मोबाईलही चोरून नेला होता. पोलिसांच्या तपासात या मोबाईलचे लोकेशन पणजी येथे असल्याचे समजले.त्यानुसार पोलिसांनी पणजी येथे जात चोरट्याचा शोध घेतला.त्यामुळे त्याला ताब्यात घेणे सोपे गेले.पणजी येथे लागला छडा! चोरीचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि कणकवलीतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक चोरट्याच्या मागावर होते.  पणजी शहरात पायी गस्त घालत असताना संतोष वसंत सुतार हा पणजी येथील एका कॅसीनोच्या बाहेर त्यांना दिसून आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा चेहरा पोलिसांसमोर असल्याने त्याला ओळखणे  सोपे झाले.त्याला ताब्यात घेतल्यावर  त्याच्याकडे चोरीतील दागिने व मुद्देमाल सापडून आला.

अवघ्या १६ तासांत चोरीचा उलगडा !कणकवली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे चोरीच्या घटनांमुळे पोलिसांना टार्गेट केले जात होते. मात्र, पोलिसांच्या पथकाने अवघ्या १६ तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. त्या चोरट्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. कणकवली शहरात तसेच अन्य तालुक्यात झालेल्या आणखी काही  चोऱ्यांचा उलगडाही लवकरच होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असून त्यादृष्टीने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस