वीज बिलांबाबत मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 01:27 PM2020-11-23T13:27:32+5:302020-11-23T13:29:45+5:30

sindhudurg, mahavitaran, mns, kankavli सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल माफी करणार अशी घोषणा करून ऐनवेळी जनतेची फसवणूक राज्यकर्त्यांनी केली आहे. त्याविरोधात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे आदेश देतील त्यानुसार जिल्ह्यात आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

MNS will start agitation against electricity bills | वीज बिलांबाबत मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार

वीज बिलांबाबत मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार

Next
ठळक मुद्दे वीज बिलांबाबत मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार जनतेच्या प्रश्नांसाठी राज ठाकरेंच्या आदेशानुसार होणार आंदोलन : उपरकर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल माफी करणार अशी घोषणा करून ऐनवेळी जनतेची फसवणूक राज्यकर्त्यांनी केली आहे. त्याविरोधात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे आदेश देतील त्यानुसार जिल्ह्यात आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

ते म्हणाले, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांबाबत निवेदन दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येत्या काळात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शैलेश अंधारी, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, विनोद सांडव, सुनील गवस, चंदन तेली, सनी बागकर, विनायक गावडे, राजू गुरव आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक कणकवलीत झाली. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सरकारला सोमवारपर्यंत राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर मोर्चा किंवा अन्य आंदोलन केले जाईल. हे वीज बिल माफी आंदोलन जनतेला घेऊन केले जाईल.

सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदन दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. गोवा बनावटीची दारू, मटका, जुगार, अवैध गुटखा विक्री होत आहे. त्यावर निवेदन देऊनही ते चालूच आहेत.

मोठ्या प्रमाणात होतेय अवैध वाळू वाहतूक

गोवा बनावटीच्या दारुची विक्री करणाऱ्यांना पोलीस साथ देत आहेत. तसेच अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गोव्यात ओव्हरलोड वाळू वाहतूक होत आहे. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी व आरटीओ यांना भेटून ओव्हरलोड वाळू गोव्यात जाते कशी? सीसीटीव्ही लावले आहेत त्याठिकाणी तपासणी का होत नाही? दारू आणि गुटख्याची मुख्य सेंटर बांद्यात आहेत. त्याबाबत आम्ही आवाज उठवित आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास मनसेचे कार्यकर्ते धाडी टाकतील, असा इशाराही परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला.

Web Title: MNS will start agitation against electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.