मनसे पक्षाचा लढा मराठी माणसासाठीच!, मालवणमध्ये बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:57 PM2020-10-13T12:57:00+5:302020-10-13T12:59:25+5:30

mns, sindhdurug, parsaramuparkar जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यास सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी केलेले भ्रष्टाचार मनसे लवकरच जनतेसमोर मांडणार आहे, असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला.

MNS fight for Marathi man only !, Meeting in Malvan | मनसे पक्षाचा लढा मराठी माणसासाठीच!, मालवणमध्ये बैठक

मालवण तालुका मनसेच्या बैठकीत परशुराम उपरकर यांनी संबोधित केले.

Next
ठळक मुद्देमनसे पक्षाचा लढा मराठी माणसासाठीच!, मालवणमध्ये बैठकआमदारांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार : परशुराम उपरकर

मालवण : जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यास सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी केलेले भ्रष्टाचार मनसे लवकरच जनतेसमोर मांडणार आहे, असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला.

मालवण तालुका मनसेची बैठक उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरड येथील लीलांजली सभागृहात झाली

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर अध्यक्षा भारती वाघ, उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, मनविसे तालुकाध्यक्ष विनायक गावडे, उपतालुकाध्यक्ष उदय गावडे, भूषण गावडे, सचिन गावडे विशाल ओटवणेकर, हरी खवणेकर, संकेत वाईरकर, विशाल माडये, अमित राजापूरकर, नंदकिशोर गावडे, संतोष सावंत, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.

उपरकर म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जनता कणखर नेतृत्व म्हणून सध्या पाहत आहे. विविध प्रश्न घेऊन अनेक शिष्टमंडळे कृष्णकुंजवर दाखल होत असून राज ठाकरे त्यांचे प्रश्न सोडवित आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसे लढत आहे. या सर्व कारणांमुळे अनेक तरुण कार्यकर्ते मनसेमध्ये दाखल होत आहेत. तालुक्यात सर्जेकोट, तारकर्ली, देवबाग, साळेल, मालवण शहरातील अनेक तरुणांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त गावागावात मनसेचा झेंडे फडकविले जाणार आहेत.

तालुक्यातील प्रश्न जैसे थे!

आमदार वैभव नाईक तालुक्यातील आरोग्यविषयक सुविधांचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. महिला रुग्णालय सहा वर्षांत अपुरेच राहिले. त्यासाठी एक कोटीचा निधी आणल्याचे आमदार सांगतात व काही दिवसांनी पुन्हा त्याच रुग्णालयासाठी मंत्र्यांकडे निवेदने देऊन निधीची मागणी करतात. आमदार असे जनतेला किती दिवस खेळवित राहणार?

 

Web Title: MNS fight for Marathi man only !, Meeting in Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.