अवैध सिलिका मायनिंग विरोधात मनसेचे २५ नोव्हेंबरला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 03:44 PM2021-11-23T15:44:09+5:302021-11-23T15:45:24+5:30

कणकवली : सिलिका माफियांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. असा आरोप करतानाच सिलिका वॉशिंग प्लांटचे दूषित पाणी नदीत सोडून जनतेचे ...

MNS agitation on November 25 against illegal silica mining | अवैध सिलिका मायनिंग विरोधात मनसेचे २५ नोव्हेंबरला आंदोलन

अवैध सिलिका मायनिंग विरोधात मनसेचे २५ नोव्हेंबरला आंदोलन

Next

कणकवली : सिलिका माफियांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. असा आरोप करतानाच सिलिका वॉशिंग प्लांटचे दूषित पाणी नदीत सोडून जनतेचे आरोग्य अवैध सिलिका व्यावसायिक धोक्यात आणत आहेत. याविरोधात २५ नोव्हेंबरला मनसे कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, संतोष कुडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.   

परशुराम उपरकर म्हणाले, कासार्डे, पियाळी, वाघेरी येथील अवैध सिलिका उत्खननाबाबत मनसेने यापूर्वी शासन दरबारी तक्रार केली आहे. तर पालकमंत्री व खासदारांनीही अवैध मायनिंग विषयी केलेल्या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सिलिका मायनिंग बाबत ९ प्रकारच्या ३४८ त्रुटी काढल्या आहेत. सीमांकन नाही, पाण्याचा साठा उपसणे,नदीत दूषित पाणी सोडणे, सिलिका साठ्याची नोंदणी नसणे,वाहतूक परवाना  नसणे आदी त्रुटी आहेत. महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध सिलिका साठ्याची सिलिका माफियांनी चोरी केली आहे. ३० मार्च रोजी कणकवली प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडून आलेल्या अहवालानुसार आपला अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. मात्र, याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील ८ महिन्यात कोणतीही कारवाई केली नाही.

दीडशे ते दोनशे कोटींचा शासनाचा महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि सिलिका माफियांनी संगनमताने बुडवला आहे. पियाळीतील अवैध सिलिका साठयाच्या चोरीविरोधात कारवाई न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार असा इशाराही यावेळी परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

Web Title: MNS agitation on November 25 against illegal silica mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.