शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:17 IST

मनसेच्यावतीने गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकणकवलीत कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन बांधकाम विभागांतर्गत समस्यांकडे वेधले लक्ष !; जोरदार घोषणाबाजी

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हयातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अनेक समस्या असून त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्यावतीने गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अधिक्षक अभियंत्यांना देण्यासाठी निवेदन सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, संतोष कुडतरकर, संतोष सावंत, चंदन पांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यांवर पडलेल्या खडडयांमुळे जनतेला व वाहतुकीला होणारा त्रास याबाबत प्रत्येक वर्षी मनसे तसेच वेगवेगळया पक्षांकडून आंदोलन करण्यात येते. या आंदोलनाच्यावेळी कार्यकारी अभियंता , उपअभियंता यांच्याकडून समर्पक उत्तरे दिली जात नाहीत. प्रत्येकवर्षी पडलेले खडडे जांभ्या दगडांनी बुजविल्यानंतर चार ते पांच दिवसांतच पुन्हा उखडण्याची प्रक्रिया सुरु होते.

या रस्त्यांवरील खडडे बुजविण्यासाठी कोटयावधी रुपये खर्च केले जातात. मात्र ,खड्डे पुन्हा पडतात. त्याबाबत निवेदने देण्याबरोबरच आंदोलने करुन देखील परिस्थिती सुधारत नाही. गेली दोन वर्षे आपल्या परवानगीने खरेदी केलेल्या पावसाळी डांबरांची भरलेली पिंपे मोठया प्रमाणांत उपलब्ध आहेत.

तसेच लाखोंचा निधीसुध्दा उपलब्ध असताना खडडे भरण्याचे काम पावसाळी डांबराने न करता ते जांभ्या दगडाने , मुरुमाने भरले जातात. अशाप्रकारे कोटयावधी रुपये खर्च करुन वाया घालविले जातात. त्यामुळे त्याला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी .अत्यावश्यक कामांची दुरुस्ती तसेच काही नव्याने कामांची अंदाजपत्रके तयार करुन जॉब नंबर करिता आपल्याकडून कामांचा निधी व मान्यता मार्च अखेर दोन महिन्यांपूर्वी घेतली जातात . पण संबधित कामे काम वाटप समितीकडे पाठविण्यापूर्वी पूर्ण केली जातात .

तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना शाखा अभियंत्यांकडून कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते . त्या कामाचे ५ टक्के घेण्याचा आग्रह सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडे धरला जातो. याबाबत काही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आमच्याकडे तक्रार केल्यानंतर त्या तक्रारदार अभियंता यांची कामे रद्द केलेली आहेत.

अत्यावश्यक कामे नसताना मार्च अखेर अशाप्रकारची कामे जॉब नंतर घेऊन त्या कामातील पैसे वाटून घेतले जातात . अशी तक्रार आमच्याकडे आलेली आहे . त्यामुळे २५ लाखांची मर्यादा पूर्ण झाली त्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम वाटप समितीकडून काम देऊ नये. नवीन सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम वाटप समितीने कामे द्यावीत .शासन निर्णयाप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार व मजूर सोसायटी यांना बांधकाम विभागाकडे असलेल्या पूर्ण कामांची कामे वाटली जातात. टक्केवारीने ती सर्व कामे ठेकेदारांना खुल्या निविदांमध्ये दिली जातात . त्यामुळे शासनाच्या निर्णयाची पायमल्ली होत असून सुशिक्षित बेरोजगारांना शासन निर्णयाप्रमाणे कामे दिली जात नाहीत . ती कामे देण्याची कार्यवाही तत्काळ व्हावी .जिल्हयातील ज्या रस्त्यांचे ५ वर्षे दायित्व ठेकेदाराचे आहे . अशा रस्त्यांवर पडलेले खडडे भरणे व दुरुस्ती करण्याकरिता त्यांना नोटीस दिली जात नाही . याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे . त्या सर्व दायित्व असलेल्या ठेकेदारांना पावसात पडलेल्या खडड्यांबाबत आठ दिवसांत नोटीस काढण्यात यावी .आचरा - कणकवली या रस्त्यावर आठ कोटीच्या कामाचे बीएम काही भागांमध्ये केलेले आहे . ते ब-याच ठिकाणी वाहून गेलेले आहे . ते पाहाणी करण्यांकरिता कार्यकारी अभियंत्यांनी सूचना केल्यानंतर शाखा अभियंता कांबळी यांच्या समवेत आम्ही गेलो होतो. त्यावेळी अनेक ठिकाणी बीएमवर खड्डे पडलेले दिसले . ते बीएम पुन्हा मारुन घेऊन हॉटमिक्स करण्यात यावे . ज्यांनी मुदतीमध्ये काम पूर्ण केले नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी . तसेच जिल्हयातील सर्व हॉटमिक्सची कामे करताना डांबर ३ : ३ हे निविदेमध्ये नमूद असताना त्याठिकाणी कमी प्रमाणात डांबर वापरुन रस्ते दर्जाहिन बनवले जातात .

कोकणातील रस्त्यांच्या मध्यभागी उंचवटा व दोन्ही बाजूंना उतार होण्यासाठी सेन्सार पेवर वापरण्याची तरतूद निविदेमध्ये असताना ते न वापरताही बिल अदा केले जाते . त्यामुळे ठेकेदारांचा फायदा बघितला जात आहे. परिणामी पाऊस पडल्याने पावसाचे पाणी दोन्ही बाजूंना वाहून न जाता पाणी साठून खडडे पडतात . हे तत्काळ बंद झाले पाहिजे. अशा अनेक समस्या असून त्यावर तातडीने तोडगा काढावा व त्याची माहिती आम्हाला द्यावी. अन्यथा जनतेला सोबत घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. असेही या निवेदनात म्हटले आहे.

 

 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग