शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

'काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे'! शिवसेना आमदाराची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:53 IST

उद्धव ठाकरे यांचा फोटो असणाऱ्या या पोस्टमध्ये “काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे”. असा उल्लेख या पोस्ट मध्ये केला आहे.

कणकवली : राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली. शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार ‘नॉट रिचेबल’ असल्याने राज्यातील राजकारणात वादळ उठले. यासर्व घडामोडींवर शिवसेना नेते संजय राऊत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. दोन आमदारांचे अपहरण करण्यात आली असून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.यातच कोकणातील उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू आमदार म्हणून ओळख असणारे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या व्हाट्सअप प्रोफाईलला ठेवलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांचा फोटो असणाऱ्या या पोस्टमध्ये “काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे”. असा उल्लेख या पोस्ट मध्ये केला आहे.आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून परिचित आहेत. तसेच शिवसेनेला डिवचणार्‍या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केल्यामुळे शिवसेनेमध्ये वैभव नाईक या नावाला विशिष्ट वजन आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांची व्हाट्सअप पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

राजकीय उलथापालथ होणार?सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान शिवसेनेनं शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ