शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आमदार नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनावर उद्या सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 17:59 IST

पोलीस कोठडीनंतर आता राणेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत ते न्यायालयीन कोठडी असणार आहेत. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज कणकवली न्यायालयात राणे हजर झाले होते. आजच्या सुनावणीकडे राणे कुटुंबीयासह राज्याचे लक्ष होते. मात्र राणे यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. पोलीस कोठडीनंतर आता राणेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार आहे.आमदार राणे दुपारी ३.२७ वाजता कणकवली न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. यानंतर न्यायालयाने राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान राणेंनी जामिनासाठी ओरोस येथील सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सुनावणीची तारीख दिली जाईल. तर, आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी जिल्हा, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयासमोर शरण आले होते. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज या पोलीस कोठडीची मुदत संपली असता ते न्यायालयात हजर झाले होते. मात्र आजही राणे यांना दिलासा मिळाली नाही. न्यायालयाने त्यांना पुन्हा १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Courtन्यायालय