शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधी खर्च करण्यात नितेश राणेच भारी, जिल्ह्यात आतापर्यंत 'इतका' निधी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 17:07 IST

जिल्ह्यात ३ आमदारांसाठी १५ कोटी रुपयांचा आमदार निधी मंजूर

मनोज वारंगओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी शासनातर्फे प्रत्येक आमदाराला ५ कोटीचा आमदार निधी मिळत असतो. ३१ मार्चपर्यंत आमदार निधी खर्च करायचा असतो. आतापर्यंत प्रत्येक आमदाराला ४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तर उर्वरित प्रत्येकी १ कोटी निधी लवकरच प्राप्त होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ असून या मतदार संघाच्या विकासासाठी शासनाकडून प्रत्येक आमदाराला वर्षाला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. यातून ३ आमदारांसाठी एकूण १५ कोटींचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यापैकी २०२२-२३ या वर्षात आतापर्यंत प्रत्येक आमदाराला आतापर्यंत प्रत्येकी ४ कोटी रुपयांचा निधी असा एकूण १२ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे.

यापैकी १२ कोटी ३ लाखांची कामे मंजूर झाली असून १० कोटी १५ लाख एवढा आमदार निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करायचा आहे. त्यामुळे याच महिन्यात निधी वितरणाला गती येते. त्यामुळे आमदार विकास निधी वितरणाची व खर्चाची आकडेवारी ही दररोज बदलते. प्रत्येक आमदाराचा विकास निधी हा ३१ मार्चपर्यंत पूर्ण खर्च होत असतोच.वर्षाला ५ कोटींचा निधीप्रत्येक आमदाराला मतदार संघाच्या विकासासाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी ५ कोटी रुपये विकास निधी प्राप्त होतो. परंतु ५ कोटीपेक्षा अधिकच्या कामांनाही प्रशासकीय मंजुरी देता येते. त्यामुळे आमदार हे जास्तीत जास्त कामांच्या फाइल तयार करतात.निधी खर्चात आमदार राणे आघाडीवरआमदार निधी खर्चात २०२२-२३ या वर्षात कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे हे आघाडीवर आहेत. त्या पाठोपाठ आमदार दिपक केसरकर आणि आ. वैभव नाईक यांचा समावेश आहे.नितेश राणे, ३ कोटी ६२ लाख खर्चकणकवली-देवगड-वैभववाडी  विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या आमदार निधी मधून ४ कोटी ७० लाखांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ६२ लाख एवढा निधी खर्च झाला आहे. दीपक केसरकर, ३ कोटी ५१ लाख खर्चसावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या आमदार निधी मधून ४ कोटी ११ लाखांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ५१ लाख एवढा निधी खर्च झाला आहे. वैभव नाईक, ३ कोटी २ लाख खर्चकुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार निधी मधून ३ कोटी १९ लाखांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी २ लाख एवढा निधी खर्च झाला आहे. उर्वरित ३ कोटी लवकरच प्राप्त होणारजिल्ह्यात ३ आमदारांसाठी १५ कोटी रुपयांचा आमदार निधी मंजूर आहे. त्यापैकी १२ कोटी प्राप्त झाले असून ३ कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMLAआमदारNitesh Raneनीतेश राणे