शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

..तर समजायचं टोल आंदोलन यशस्वी झाले, नितेश राणेंची शिवसेना नेत्यांवर तिरकस टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:14 IST

टोल नाका जाळणार, फोडणार अशा धमक्या देऊन टोलवसुलीचा ठेका मिळालेल्याला जवळ करायचे अन्

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्यावर टोल सुरु होणार आहे. काल, बुधवारी १ जूनपासून टोल वसुली सुरु करण्यात येणार होती. मात्र टोलवसुलीबाबत अद्याप संभ्रम आहे. दरम्यान याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यावरुन आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांवर तिरकस टीका केली आहे.शिवसेनेचे नेते टोल आंदोलन करतात. त्या टोलला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधीच स्थगिती दिली आहे. शिवसेनेचे काही नेते नवीन फॉर्च्यूनर, इनोव्हा गाड्यांमधून फिरताना दिसतील, त्यावेळी समजावे टोल आंदोलन यशस्वी झाले असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. फोंडाघाट ग्रामपंचायत भवनच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते.राणे म्हणाले, जिल्हावासीयांना टोल नको असेल तर होणार नाही. मात्र हे शिवसेनेचे आंदोलन टोल विरोधी आहे काय ? शिवसेना नेत्यांच्या गाड्या जुन्या झाल्या आहेत. काही लोकांच्या फॉर्च्यूनर जुन्या झाल्या आहेत तर काहींचे इनोव्हाचे हप्ते थकल्याने जप्ती आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करायची तर त्यांना लोकांमध्ये जावे लागते, आणि हे दुचाकीवरून गेले तर यांना कोण विचारणार आहे का? त्यासाठी मोठी गाडी पाहिजे. ती गाडी मिळवण्यासाठी हे टोल विरोधी आंदोलन सुरू आहे.टोल नाका जाळणार, फोडणार अशा धमक्या देऊन टोलवसुलीचा ठेका मिळालेल्याला जवळ करायचे आणि गाडी मिळवायची. आता काही दिवसांनी या सेना नेत्यांकडे नव्या गाड्या दिसतील, म्हणजे समजायचे शिवसेनेचे टोल आंदोलन यशस्वी झाले. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी यावेळी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे tollplazaटोलनाकाShiv Senaशिवसेना