शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संजय राऊतांची पात्रता नाही - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: August 5, 2024 18:11 IST

कणकवली: चांगल्या आंब्याच्या पेटीत सडका आंबा ठेवला तर सगळेच आंबे खराब होऊन जातात. राजकारणातील संजय राऊत हे अशाच पद्धतीचे ...

कणकवली: चांगल्या आंब्याच्या पेटीत सडका आंबा ठेवला तर सगळेच आंबे खराब होऊन जातात. राजकारणातील संजय राऊत हे अशाच पद्धतीचे सडका आंबा आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी काम केले आहे. आता कार्यतत्पर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १०० पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते. उद्धव ठाकरे यांना ७० आमदार सुद्धा निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे राजकारणातील सडका आंबा असलेल्या संजय राऊत यांची समाजाभिमुख काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. राणे म्हणाले, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांचे कार्य पहावे. विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्यांनी चांगले काम केले. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण टीका करू नये. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी शरद पवार यांना अदानी बदलची आपली भूमिका स्पष्ट करायला सांगावी. उद्धव ठाकरे यांच्या  भूमिकेची दखल न घेण्याचे काम शरद पवार हे कृतीतून करत आहेत. यावर संजय राऊत यांनी बोलावे. त्यांना कधी तरी त्याबाबत जाब विचारावा...त्याचे पुरावे आता दाखवावे लागतीलउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सभागृहात फडणवीस यांनी आरोप केले होते. तेव्हा सचिन वाझे यांच्यावर करवाई करायला तो लादेन आहे का ?  असे उद्धव ठाकरे यांनी विचारून कोणतीच कारवाई केली नव्हती. सचिन वाझेंना कोण कुठे घेऊन फिरायचा त्याचे पुरावे मला आता दाखवावे लागतील.आमचे सरकार धारावीचा प्रकल्प पूर्ण करणार मुंबईला लुटण्याची हिम्मत कोणी करणार नाही. आमचे सरकार पुन्हा येणार आहे. ते धारावीचा प्रकल्प पूर्ण करणार आहे. मॅच फीक्सिंगचे आरोप राज ठाकरेंवर राऊत करीत आहेत. मात्र, राज ठाकरेच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. इस्लामिक देशात वक्फ बोर्डचा कायदा नाहीवक्फ बोर्डचा कायदा फक्त आपल्या देशात आहे. इतर कोणत्याही इस्लामिक देशात हा कायदा नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी त्याबाबत चांगला निर्णय घेतील,असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस