शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला 'फाइव्ह स्टार' झळाळी!, पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा; मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 12, 2026 19:13 IST

पर्यटन आराखड्याचे सादरीकरण

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या प्रस्तावित पंचतारांकित (५ स्टार) हॉटेल प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता वेग येणार आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून तो तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना सक्रिय होण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात गुरुवारी (दि.१२) विशेष आढावा बैठक पार पडली. २३ डिसेंबर २०२५ रोजी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि प्रलंबित बाबींवर चर्चा करून प्रशासकीय त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला आणि स्थानिक रोजगार निर्मितीला या प्रकल्पामुळे गती मिळणार आहे.या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकास उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, 'सिस्टुला ट्यूलिप पीएलसी'चे अध्यक्ष माइक बेरी आणि संचालक अमित कामत उपस्थित होते.

तांत्रिक अडथळे दूर होणारया प्रकल्पाच्या मार्गातील प्रलंबित तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचा बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढून प्रकल्पाचा मार्ग सुकर करण्याचे निर्देश यावेळी यंत्रणांना देण्यात आले.

पर्यटन आराखड्याचे सादरीकरणजिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे बैठकीत सविस्तर सादरीकरण झाले. सिंधुदुर्गला जागतिक स्तरावर पर्यटनाचे 'हब' बनवण्यासाठी कोणत्या दर्जेदार सुविधा आवश्यक आहेत, यावर बैठकीत विशेष चर्चा झाली.

प्रशासकीय समन्वयावर भरजिल्हा प्रशासन आणि गुंतवणूकदार संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांना प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी जलद गतीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यात उच्च दर्जाच्या सुविधांची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. पंचतारांकित हॉटेल प्रकल्पातील तांत्रिक बाबी लवकरात लवकर निकाली काढून प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. यातून जिल्ह्याचा पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार वाढीस लागेल. - नितेश राणे (मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री)

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg Tourism to Shine with Five-Star Hotel Project Approval

Web Summary : Sindhudurg's tourism gets a boost with a five-star hotel project. Minister Nitesh Rane expedited the project, resolving technical hurdles. This initiative promises economic growth and local job creation.