शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

Sindhudurg: कणकवलीतून परप्रांतीय कामगाराचे अपहरण, रिक्षाचालकासह एकास अटक

By सुधीर राणे | Updated: December 29, 2023 13:13 IST

रोख रकमेसह मोबाईल असा ३९ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

कणकवली : कणकवली समर्थनगर येथे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या फरशी बसविणाऱ्या परप्रांतीय कामगाराचे अपहरण करण्यात आले. त्याला बेदम मारहाण करत त्याच्या एटीएम मधून रोख रक्कम तसेच मोबाईल लंपास करण्याचा प्रकार कणकवलीत एक रिक्षा चालक व त्याच्या सहकाऱ्याने केला. ही घटना सोमवारी घडली. त्यामुळे कणकवली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान, कणकवली पोलिसांनी याघटनेबाबत तक्रार दाखल होताच चौवीस तासात तातडीने तपासाची चक्रे फिरवीत सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघा संशयित आरोपींना शिताफीने अटक केली आहे. या घटनेबाबत कणकवली पोलिस ठाण्यात धीरेंद्रकुमार श्रीकांत यादव (वय-३२,रा. उत्तरप्रदेश) याने तक्रार दिली आहे.  धिरेंद्रकुमार हा फरशी बसविण्याचे काम करतो. २५ डिसेंबर  रोजी रात्री साडेनऊ वाजता तो दुचाकीने कणकवलीत आला होता. आपले बाजारातील काम केल्यावर तो शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात रेल्वे स्टेशनजवळील समर्थनगरकडे जाण्यासाठी रिक्षा (क्रमांक एम.एच.०७-ए.एच. २९४९) मध्ये बसला.रिक्षामध्ये चालक अल्ताफ अख्तार (रा. कलमठ, गावडेवाडी) याच्यासह त्याचा सहकारी आरोपी सुहास घोगळे (कलमठ) रिक्षात होता. त्यांनी धीरेंद्रकुमारला मारहाण करत गोव्याच्या दिशेने घेऊन गेले.पुन्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी कुडाळात आणले. त्याच्याकडील एटीएम कार्ड घेत पासवर्ड घेऊन १८ हजार रुपये तसेच मोबाईल काढून घेत त्याला कुडाळ बसस्थानक येथे सोडून देत पसार झाले. धिरेंद्रकुमारने याबाबत आपल्या मुकादमाला माहिती दिली. यानंतर कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक  अनिल हाडळ, राजेंद्र गाडेकर, शरद देठे, हवालदार पांडुरंग पांढरे ,वाहतूक पोलिस हवालदार विनोद चव्हाण यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या तपासात सहभागी झाले होते.पोलिसांनी कुडाळ येथे जाऊन आरोपीनी पैसे काढलेल्या एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असात रिक्षाचा शोध लागला. रिक्षाच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. त्याने आपण कलमठ येथील अल्ताफ याला रिक्षा दिल्याचे सांगितले. गुरुवारी सकाळी त्याच्या कलमठ येथील घरी जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यावर सुहास घोगळे याचे नाव निष्पन्न झाले. त्यालाही ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी करून अल्ताफ आणि सुहास या दोघांना  कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपनिरिक्षक राजेंद्र गाडेकर करत आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस