सिंधुदुर्गनगरी : गेल्या २५ वर्षांच्या सेवेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलिस नाईक मिलिंद अंकुश परुळेकर यांना २०१५ सालाकरिता पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले असून, त्याचे वितरण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. परुळेकर हे १९९१ पासून जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या विभागात सेवा बजावली. त्यांना सीडीआर अॅनालिसीस व सायबर क्राईमचे चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त असून, या ज्ञानाच्या आधारे त्यांनी आतापर्यंतच्या सेवा कालावधीमध्ये अनेक बेपत्ता तसेच दरोडा, खून व चोरीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहकार्य केले. त्यांना आतापर्यंत १८४ बक्षिसे मिळालेली आहेत. (प्रतिनिधी)
मिलिंद परुळेकर यांना सन्मानचिन्ह
By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST