सीएएच्या समर्थनार्थ कुडाळात विशाल लक्षवेधक तिरंगा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:20 PM2020-02-22T12:20:51+5:302020-02-22T12:22:31+5:30

केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या समर्थनार्थ कुडाळ शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली. तिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमधील विशाल तिरंगा लक्ष वेधून घेत होता.

 Massive tricolor rally in the hut in support of the CAA | सीएएच्या समर्थनार्थ कुडाळात विशाल लक्षवेधक तिरंगा रॅली

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनासाठी कुडाळमधून निघालेल्या रॅलीमध्ये तिरंगा ध्वज लक्षवेधी ठरला.

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशप्रेमी मंचाचे तहसीलदारांना निवेदन

कुडाळ : केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या समर्थनार्थ कुडाळ शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली. तिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमधील विशाल तिरंगा लक्ष वेधून घेत होता.

या रॅलीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, नगराध्यक्ष ओंकार तेली, रणजित देसाई, भाजपाचे तालुकाध्यक्ष गोपाळ हरमलकर, मिलिंद देसाई, विवेक पंडित, बंड्या सावंत, अभय शिरसाट, धीरज परब, संध्या तेरसे, अ‍ॅड. विवेक मांडकुलकर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडून रॅलीला प्रारंभ होऊन गांधी चौक, जिजामाता चौक अशी तहसील कार्यालयात ती पोहोचली. विशेषत: महिलांच्या हातात नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणारे फलक होते. भारतमातेची प्रतिकृती, भगवा व तिरंगा झेंडा लक्षवेधी ठरला. शांततेत निघालेल्या रॅलीत ह्यवंदे मातरम्, भारत माता की जयह्ण अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

यावेळी देशप्रेमी नागरिक मंचाच्यावतीने तहसीलदार रवींद्र नाचणकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने भारतीय घटनेच्या अधीन राहून मंजूर केलेल्या नागरिकता सुधारणा कायद्यास आम्हा देशप्रेमी नागरिकांचा मनापासून पाठिंबा असून सरकारने या कायद्याची संपूर्ण देशभर विनाविलंब अंमलबजावणी करावी. आपण आमची ही मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी, असे नमूद केले आहे.

संविधानाची काढली पालखीतून मिरवणूक

पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी विवेक विचार मंचाचे सहसंयोजक उमाकांत गायकवाड यांनी सांगितले की, हा कायदा लागू झाला पाहिजे. लोकसंख्या नियंत्रित झाली पाहिजे. देशभक्तीचे प्रदर्शन असता कामा नये तर देशभक्तीला मर्यादा घालून घ्यावी लागेल. यासाठी आपण या सुधारणा कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ढोलताशांच्या गजरात पालखीतून संविधनाची मिरवणूक काढण्यात आली.
 

Web Title:  Massive tricolor rally in the hut in support of the CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.