बांदा : मराठा समाजाच्या जेलभरो आंदोलनात बांदा दशक्रोशीतील ५ हजारांहून अधिक मराठा बांधव एकवटणार असल्याचा निर्णय आंदोलन नियोजन बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनात अधिकाधिक संख्येने समाज बांधवांना सहभागी होता यावे यासाठी गाववार उपसमिती गठीत करण्यात आली. यावेळी दशक्रोशीतील २०० हून अधिक समाजबांधव उपस्थित होते. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. मूक मोर्चाने शासनाला जाग न आल्यानेच मराठा बांधवांना जेलभरो आंदोलन करण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जेलभरो आंदोलनात बांदा येथे एकत्र यावे व तेथून नियोजनाप्रमाणे जेलभरो आंदोलन करायचे आहे.यावेळी विलास सावंत, माजी उपसभापती विनायक दळवी, मनाली देसाई, अरुणा सावंत, लक्ष्मी सावंत, रिना मोरजकर, लक्ष्मण पावसकर, दादू कविटकर, सुभाष मोर्ये, वाफोली येथील बबन गवस, इन्सुली येथील अमित सावंत, फुकेरी येथील योगेश आईर, उपसभापती निकिता सावंत, गुरुनाथ सावंत, अपर्णा आगलावे, निगुडेचे माजी सरपंच आत्माराम गावडे यांनी विचार मांडले.७ आॅगस्ट रोजी मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात सुनावणीचा निर्णय जरी आरक्षणाच्या बाजूने झाला तरी ९ रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बाळू सावंत, संतोष सावंत, राकेश परब, परिमल सावंत, ज्ञानेश्वर सावंत, देवेश मुळीक, अवंती पंडित, स्वप्नील सावंत, अशोक परब, बाबा गाड, विलास गवस, श्रीधर सावंत, समीर गावडे, उदय देऊलकर, रवी आमडोसकर, दयानंद धुरी, जनार्दन सावंत, राजेश सावंत, भिकाजी गावडे, संदेश भोगले, राजू सावंत, यशवंत सावंत, अंकिता देसाई, मनाली नाईक विनेश गवस आदी उपस्थित होते.
Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलनासाठी मराठा समाजाचे हजारो बांधव एकवटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:25 IST
मराठा समाजाच्या जेलभरो आंदोलनात बांदा दशक्रोशीतील ५ हजारांहून अधिक मराठा बांधव एकवटणार असल्याचा निर्णय आंदोलन नियोजन बैठकीत घेण्यात आला.
Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलनासाठी मराठा समाजाचे हजारो बांधव एकवटणार
ठळक मुद्देजेलभरो आंदोलनासाठी मराठा समाजाचे हजारो बांधव एकवटणारगाववार उपसमिती गठीत