शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलनात लाखो बांधव सहभाग घेणार, सुहास सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:03 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातून सुमारे १ लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी होणार असून हे आंदोलन सर्व तालुक्यांच्या पोलीस ठाण्यांसमोर करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजेलभरो आंदोलनात लाखो बांधव सहभाग घेणार, सुहास सावंत यांची माहिती तालुक्यांच्या पोलीस ठाण्यांसमोर होणार आंदोलन

कुडाळ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातून सुमारे १ लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी होणार असून हे आंदोलन सर्व तालुक्यांच्या पोलीस ठाण्यांसमोर करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.संपूर्ण राज्यात सकल मराठा समाज क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वय समितीच्यावतीने जेल भरो व महाराष्ट्र बंद आंदोलन ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनी पुकारण्यात आले असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी धीरज परब, भास्कर परब, संग्राम सावंत, डॉ. दीपाली काजरेकर, प्रशांत राणे, दिनेश म्हाडगुत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सावंत म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सकल मराठा समाज क्रांती मोर्च्याच्यावतीने राज्यभर ५४ ठिकाणी मूकमोर्चे काढण्यात आले.

या मूक मोर्चानंतर सरकारने राज्य मागास आयोगाची निर्मिती केली. तरीही राज्य सरकार व राज्य मागास आयोगाने आरक्षण देण्याबाबत कोणताच निर्णय दिलेला नसून केवळ चालढकलपणा करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी उग्र आंदोलने झाली होती. मराठा आमदार व आंदोलनकर्त्यांच्या दबावामुळे सरकारने ७२ हजार नोकरी भरतीला स्थगिती दिली आहे, असे असूनही आरक्षणाबाबत कोणताच निर्णय सरकारने जाहीर केला नाही.त्यामुळे ९ आॅगस्टला महाराष्ट्र बंद व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने जुलैच्या सिंधुदुर्ग बंदमध्ये ओसरगाव येथे शांततेत सुरू असलेले आंदोलनादरम्यान केलेल्या दडपशाहीचा निषेध तसेच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी हे जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद विभागातून प्रत्येकी दोन हजार आंदोलनकर्ते सहभागी होणार असून, एकूण १ लाख आंदोलनकर्ते यात सहभागी होणार असल्याचे सावंत म्हणाले. मराठा समाजाने या अगोदर केलेल्या सर्व आंदोलनाला इतर समाजबांधवांनी चांगला पाठिंबा देऊन सहकार्य केले. ९ रोजीच्या आंदोलनातही सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आंदोलनाला कृती समिती कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनने पाठिंबा दिल्याचे सावंत यांनी सांगितले.आंदोलन शांततेत होणारकुडाळ येथे ९ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळ नवीन एसटी डेपो, गांधीचौक, जिजामाता चौक व पोलीस ठाणे रॅली काढण्यात येईल. त्यानंतर जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल. हे आंदोलन शांततेत केले जाणार असून यावेळी कोणत्याही प्रक्षोभक घोषणा दिल्या जाणार नाहीत. तसेच कोणीही तोडफोड करणार नसून रस्तेही अडविण्यात येणार नसल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बंद आंदोलन होईल, मात्र ते एच्छिक असेल. आंदोलन शांततेत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्ग