सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल 131 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:57 IST2021-04-23T18:51:08+5:302021-04-23T18:57:40+5:30
CoronaVIrus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 799 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 131 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल 131 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 799 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आज आणखी 131 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक सुरू आहेत. कणकवली शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरातील पटवर्धन चौकात मागील 4 दिवसांपासून थर्मल स्क्रिनिंगसह संशयितांची रॅपिड टेस्ट केली जात आहे. आरोग्य विभागाच्या वतीने पॉझिटिव्ह पेशंटना पुढील सूचना देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 799 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.