मिठबाव येथील मनवा लोकेने संपवले जीवन; नवरा प्रसादचा झाला होता खून, प्रकरणाला लागणार वेगळे वळण
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 21, 2023 13:59 IST2023-09-21T13:59:08+5:302023-09-21T13:59:45+5:30
सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मिठबांव येथील मनवा प्रसाद लोके हिने ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रसाद लोके ...

मिठबाव येथील मनवा लोकेने संपवले जीवन; नवरा प्रसादचा झाला होता खून, प्रकरणाला लागणार वेगळे वळण
सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मिठबांव येथील मनवा प्रसाद लोके हिने ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रसाद लोके याचा काही दिवसांपूर्वी १७ सप्टेंबर रोजी मसवी आचरा रस्त्यावर खून झाला होता. त्या पाठोपाठ त्यांची पत्नी मनवा हिने आत्महत्या केली आहे. त्यामुळे खून प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
मनवाही आपल्या आई सोबत बेडरूममध्ये झोपली होती. तिचा डोळा लागल्यावर मनवाने टेरेसवर जाऊन लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबीयांच्या आज, गुरूवारी सकाळी पहाटे लक्षात आली. त्यामुळे पोलिसांना आता खून प्रकरणासोबतच आत्महत्या प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे. मनवाने आत्महत्या का केली असावी? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.