ओरोस : अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानभरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. १० दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २३ रोजी महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला.
अवकाळी पावसामुळे आर्थिक संकट
मोर्चाची सुरुवात ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, सुशांत नाईक, बाबूराव धुरी यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतील आंबा व काजू बागायतदार हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
अवकाळीमुळे आंबा मोहोर गळणे, काजू उत्पादन, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
Web Summary : Mango and cashew farmers in Sindhudurg protested, led by Raju Shetti, demanding compensation for crop damage due to unseasonal rains. They warn of a highway blockade on March 23 if demands aren't met within ten days, highlighting financial distress.
Web Summary : सिंधुदुर्ग में आम और काजू किसानों ने राजू शेट्टी के नेतृत्व में प्रदर्शन किया। बेमौसम बारिश से फसल नुकसान के लिए मुआवजे की मांग की। दस दिनों में मांगें पूरी न होने पर 23 मार्च को राजमार्ग जाम करने की चेतावनी दी, जिससे वित्तीय संकट पर प्रकाश डाला गया।