सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात मनाई आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 12:30 IST2017-10-08T12:30:48+5:302017-10-08T12:30:54+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीया न्याय, निर्भय वातावरणात तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको आंदोलनासारखे सर्व मिरवणूका सारखे सर्व कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत. 

Mandate order in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात मनाई आदेश

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी दि. 08 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीया न्याय, निर्भय वातावरणात तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको आंदोलनासारखे सर्व मिरवणूका सारखे सर्व कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत. 

जिल्‍ह्यातील कायदा  व सुव्‍यवस्‍था परिस्थिती अबाधित राखण्‍यासाठी  तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्‍हणून सिंधुदुर्गचे जिल्‍हादंडाधिकारी  उदय चौधरी यांनी त्‍यांना प्राप्‍त असलेल्‍या शक्‍तीचा वापर करून महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) प्रमाणे दिनांक 08 ऑक्टोबर 2017 रोजी 02.00 वाजले पासून ते दिनांक 22 ऑक्टोबर 2017 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यंत या कालावधीसाठी  सिंधुदुर्ग  जिल्‍ह्याचे संपुर्ण भूभागात मनाई आदेश  जारी  केला आहे

Web Title: Mandate order in Sindhudurg district